तू म्हणालीस



जरा थांबलो होतो मी कुठे
तू म्हणालीस थांबणे गैर येथे

जरा कुठे गळाली आसवे दोन माझी
तू म्हणालीस रडणे गैर इथे

मी होतो माझ्यात गुंतलेला
तू म्हणालीस एकटे चालणे गैर येथे

मी चुकलोच होतो अताशा
तू म्हणालीस मैत्रीच गैर येथे...

तू...मानव जातीवर झालेला बलात्कार

तू नराधम....तू यम..
तू अंत...तू एक खंत...

तू क्रुर...तू असुर...
तू दंश...विनाशाचा अंश...

तू ग्रहण...तू मरण...तू
अंधार...तू भुमिचा भार...

तू अंध...तू मदांध...
तू मानव? तू दानव...

तू बलात्कारी...तू मारेकरी....
तू विनाश...तू सर्वनाश....

तू...मानव जातीवर झालेला बलात्कार
तू...मानव जातीची झालेली हार
शब्द - संदीप सुरळे

वेदना बोलायला लागल्या तर

वेदना बोलु लागल्या तर
त्या हजार जिभांनी ओरडतील
प्रत्येक वेदना दुसर्‍या वेदनेचा
आक्रोश खोडुन काढतील

मीच श्रेष्ठ असं म्हणत
वेदना-वेदनांमध्ये चुरस लागेल
प्रत्येक वेदना दुसर्‍या वेदनेकडं
मग तुच्छतेनं बघेल

मनात, तनात, घरात, दारात
फ़क्त वेदना दिसु लागतील
काहीच उरणार नाही कुठं
सर्वत्र फ़क्त वेदनाच भासु लागतील

पण...
पण वेदना बोलायला लागल्या तर
ऐकायला कुणीच उरणार नाही
कदाचित म्हणुनच सार्‍या वेदना
मौन पांघरुन शांत निजल्या आहेत..प्रत्येकात...

"आया"

तू म्हणालीस...
आता आपण आपलं घर थाटूया
आपल्या दोघांच्या संसारात दोघंच नटुया

तशी नेहमीच सवय...
मला तुझ्या हो ला हो म्हणायची
तू सांगशील अगदी तसं वागायची

मन कावरं बावरं झालंही जरासं
आईवडिलांपासुन दूर जाताना
आजवर तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे जपलं
त्यांना वार्‍यावर सोडताना

आता जरी आलो आपल्या घरात..
इथं आपलेपणा नाही गं जाणवत..
इथं काही तुझं आहे अन काही माझं..
खरं खुरं प्रेम आत इथं नाही पाणवत...

अन काल तू म्हणालीस...
तुझ्या आईला बोलावुन घे...
"आया" परवडणार नाही
अन ह्याचं सारं करणं मला काही जमणार नाही...

--संदीप सुरळे

Standard

डँड आणी मी एकाच डिस्कोत जातो
माँम आणी मी एकाच ग्लासातुन पितो
कधि डँड ला मी सावरतो
कधि माँम मला सावरते

लाईफ़ हे असचं सुरु आहे
High Society मध्ये सालं हे बरं आहे
काहीपण करायचं आणी फ़ँशन म्हणायचं
थोडसं वेगळं करुन इथं center of attraction बनायचं

Standard सांभाळायचं
म्हणुन इथं प्याव लागतं
काय मिळवण्यासाठी
इथं काय द्यावं लागतं?--संदीप सुरळे

थोडं दुखायला लागलं

मलाही आता थोडं दुखायला लागलं...
जगाकडं पाहुन कुठंतरी काहितरी खुपायला लागलं...
आई ऐवजी mom म्हणु लागलो...
फ़टाकड्या पोरींसाठी पैसे खर्चुन बाँम्ब बनु लागलो...
सिगारेटच्या धुरात स्व:तला हरवुन घेतोय...
गाईच्या ताज्या दुधाऐवजी पाश्चिमात्य पेयं पितोय...
सिनेमाला जाऊन धमाल होऊ लागली...
आधाराला खांदा मिळावा म्हणुन पोरगी हाताशी येऊ लागली...
माझं 'मी' पण कुठंतरी हरवलंय...
अन एक वेगळंच शहरी पिल्लु गवसलयं...
इथं नात्यांना जागा नाही...
प्रेमाचा हळुवार धागा नाही...
हे कसलं जगणं ?ज्याला कुठलचं भविष्य नाही....
हे फ़क्त वाहत जाणं... हे आयुष्य नाही...

पण हे सारं सारं आता क्षणिक वाटू लागलं....
सारं सारं अस्पष्ट होतं जाऊन...डोळ्यावर धुक दाटू लागलं..
आता आठवतो माझा गाव....गावाचा पार..
सकाळीच काढलेली गाईच्या ताज्या दुधाची धार...
आईनं बनवलेली भाकरी आठवते...
दोन पैशासाठी वडीलांनं केलेली चाकरी आठवते...
जीव गुदमरु लागतो...
घराच्या ओढीनं झुरु लागतो...
पण पुन्हा वडीलांच्या डोळ्यातलं स्वप्न दिसु लागतं...
अन क्षणभर वेडं झालेलं एक शहाणं पोर आता नियमीत अभ्यासाला बसु लागतं..

" सगळंचं जग स्वार्थी "

" सगळंचं जग स्वार्थी " असं मी म्हणतो
अन सगळ्यांच्या जगामध्ये मीसुध्दा मोडतो

असतंच की जग स्वार्थी ,नाही कोण म्हणतं?
पण मग प्रत्येकजण " मी स्वार्थी नाही " असं का म्हणतं?

दाखवायचं रुप एक आणी मनात एक दडवायचं
असं दुहेरी वागणं का? का म्हणुन जगायचं?

स्वार्थी असावं प्रत्येकानं..नक्कीच असावं...
स्वार्थी असलं तरच काहीतरी साधता येईल...स्व:तचा अर्थ शोधता येईल

स्वार्थ नसतो कुणाकडे? त्या श्रीकृष्णाकडेही स्वार्थ होता
कौरवांच्या नाशासाठीच तर त्याने घडविला पार्थ होता

टीळक सुध्दा मला स्वार्थीच वाटले...
तेही स्वातंत्र्य "माझा" जन्मसिध्द हक्क असंच म्हटले...

होय मीही आहे स्वार्थी ...स्वार्थी होऊन जगणार...
सामान्य.... अगदी सामान्य माणुस समजुन स्व:तकडे बघणार....

सगळंचं जग स्वार्थी असं मी म्हणतो
अन सगळ्यांच्या जगामध्ये मीसुध्दा मोडतो

--संदीप सुरळे

काय उरले सांग गझले अता ?

चांदण्यांची रात मज जाळून गेली
का सये तू रात ही टाळून गेली ?

सोडले आज दुनियेस तुझ्याचसाठी
रीत दुनियेचीच तू पाळून गेली

मी कधी रडलोच नाही वाटले का ?
आसवे आली तशी वाळून गेली

पान रंगविले तुझ्या प्रेमात हर एक
डायरी ती तू फ़क्त चाळून गेली

काय उरले सांग गझले अता तुझ्यात?
नाव माझे आज तू गाळून गेली

प्रश्न

तुझ्या मिठीत रात्र जाळण्याचा प्रश्न होता
पण रित या जगाची पाळण्याचा प्रश्न होता

शब्द न लेखणीला स्फ़ुरले का माझ्या तेव्हा
तुझेच नाव जेव्हा गाळण्याचा प्रश्न होता

खुलत गेलो होऊनी फ़ुल तुझ्याच रस्त्यावरती
पण ग्रिष्मात त्याला जाळण्याचा प्रश्न होता

तुझाच गाव येता पावले अडखळली अर्ध्यात
तुझीच वाट राणी टाळण्याचा प्रश्न होता

उगीच शोधतो मी आठवांना सांग तुझ्या का?
अता तुला गझलेत ढाळण्याचा प्रश्न होता
शब्द--संदीप सुरळे

बरे झाले

बरे झाले तू तेव्हा मारले
ऐन मरणाने जेव्हा तारले

नकोसे झाले उसणे श्वास हे
भाव जगण्याचे अता वधारले

अश्रु सुकले, खंत न उरली अता
मरण्याआधिच मन हे वारले

अता वाटे जिंकावे काय ते?
प्रेम जेव्हा अर्ध्यात हारले
--संदीप सुरळे

किती?

ओठांनी ओठांना आवरावे किती?
दोघांनी दोघांना सावरावे किती?

शोधून जरी थकते नजर माझी तुला
नजरेस नजर भिडता बावरावे किती?

वेडं मन, वेडं तन, शब्द वेडावले
होऊन असे वेडे वावरावे किती?

कोण असा मी? काय तुझ्यापुढे वाटतो?
अग वेडे! सांग, मला तू वरावे किती?

पूर

कसे सांगू मी माझा कोण होता
मी आणी सुखदुखा:चा नेहमीच त्रिकोण होता

मला पाहताना कधि माझेच बिंब आचंबित
माझाच श्वास माझ्या क्षणाचा चोर होता

आपल्यांचा नाही मागमुस कुठे
इथे माणसांचा भरला बाजार होता

मृगजळामागे मी असाच धावत गेलो
घराबाहेर माझ्या झिंगत मोर होता

शोधावया निघालो एक क्षण जीवनाचा
वळून पाहता मागे...माझ्या घरात पूर होता

अरे मरणा

मरणास माझ्या
मज टाळायचे नाही
जगण्याचे खोटे वादे
मज पाळायचे नाही

जीवन सुंदर खुप जरी
कुठवर माझा ते हात धरेल
मृत्यु 'सुंदर' त्याहुन
जगण्यावर एकदा मात करेल

मरण्याआधि माझ्या
मज हसायचे आहे
हसवले जिवनास जसे
मरणासही हसवायचे आहे

अरे मरणा..मी तुझाच
शेवटी तुलाच भेटणार आहे
तुला भेटेल तेव्हा
सगळी बंधन..श्वाससुध्दा तुटणार आहे
--संदिप सुरळे

काही न बोलता...काही न सांगता....

श्वास माझा...आयुष्यभर माझी साथ देणारा...
तोही जाणारच आहे मला सोडून एक दिवस...
काही न बोलता...काही न सांगता....

जगाची रितच आहेच ना ही...
काम झालं...वेळ आली.. की जायचं सोडून...
काही न बोलता...काही न सांगता....

कित्येक क्षण येतात आनंदाचे...क्षणभर जगवतात हसत हसत...
पण...पण क्षणभरच फ़क्त....मग तेही जातात सोडुन...
काही न बोलता...काही न सांगता....

नियमच आहेना हा... मी तरी टाळू कसा?
वेळ आली की जावचं लागेल मलाही सोडुन
काही न बोलता...काही न सांगता....

नको गं..

मला अशी तोडू नको गं...
एकट्याला तू सोडू नको गं...
डाव प्रेमाचा रंगू दे खुप
स्वप्नातसुध्दा त्याला मोडू नको ग...

अबोल माझ्याशी राहू नको गं..
स्वप्नातसुध्दा एकटी जाऊ नको गं..
भर तुझ्या प्रत्येक शब्दात मला
गीत एकटीचे तू गाऊ नको गं..

पाठमोर्‍या मला पाहू नको गं..
भेटलो जिथं आपण..एकटी तिथं जाऊ नको गं..
तुझा अश्रुसुध्दा माझा
आठवणीत माझ्या त्याला वाहू नको गं...

लगागा
कशातरी या सुन्या राती टाळतो मीलगागागा गागालगा गालगागातुझ्यावीना माझे मला जाळणे हे
अता पाळणे हेहातात होतोश्वासात होतोशोधात होतो
गालगागा लगागा गालगागा
वाटले हे जगावे मी जरासे
अंगणी वाटले तू दरवळावे
श्वास का हे अडखळलेले?गालगागा लगागा गालगागा
का तुझी आठवे शोधात माझ्याजिंदगीच्या जरा भासात होतो
नाव का आज माझे खोडले तू मी कधीचा तुझ्या गीतात होतो
जाळतो मी टाळतो मीपाळतो मीगाळतो मीचाळतो मीढाळतो मीमाळतो मीवाळतो मीढासाळतो मीओशाळतो मी
रीत आहेप्रित आहेगीत आहेमीत आहेजीत पीत आहेभीत आहेहीत आहे

हिशोब मांडाया बैसलो
अन श्वासांची उधारी झाली
भरुन वाहीली झोळी आजवर
आज श्वासंना महाग झाली

आठवणीची शिदोरी
अन वेदनांचे चटके आता



*****************************
*****************************

गालगागा लगालगा लगालगा
*****************************
प्रेमगावा तुही अता फ़िरुन ये
चांदराती मिठीत मजला भरुन घे
घाव प्रत्येक आजवर
रातराणी गंध श्वासात धुंद धरुन घे
फ़िरुन घे
झुरुन घे
ठरुन घे
करुन घे
सरुन घे
उरुन घे
पुरुन घे
************************************
************************************
गालगागा गालगागा गालगागा
************************************


गालगागा गालगागा गालगागा

हुंदक्याला टाळणेही गैर येथे
आसवांना ढाळणेही गैर येथे



मी असा अपराध होता काय केला?

तू मला का माळणेही गैर येथे?


आठवांशी का अताशा वैर झाले

आठवांना चाळणेही गैर येथे



काठ ह्या नदिचा मला हा का मिळाला?

सोवळ्याला पाळणेही गैर येथे



पान मी एक त्रासलेले...संपलेले

संपताना वाळणेही गैर येथे



चार खांदे शोधताना हार झाली
का मला 'मी' जाळणेही गैर येथे?

अशी गं काय सारखी रागवत असतेस?

अशी गं काय सारखी रागवत असतेस?
माझ्यावरच्या प्रेमाला अशाही प्रकारे दाखवत असतेस...
तू रागवायचं...मी प्रेमाने तुझी समजुत घालायची...
खुप खुप प्रेम करायचं तुझ्यावर.....
कदाचीत यासाठी....
याचसाठी तू रागवत असतेस पुन्हा पुन्हा....हो ना?
ठाऊक आहे मला....
ठाऊक आहे मला....तू नसलीस बोलत तरी तुझे लटके डोळे सारं सारं सांगुन जातात
मी बघावं तुझ्याकडे प्रेमाने म्हणुन तुझ्याचसारखे तेही वेडे आस लावुन बसतात.
मी खुप खुप बोलत रहायचं......
एकट्यानेच....
तू नुसतंच ऐकायचं...
थोडा वेळ......फ़क्त थोडा वेळ गप्प राहायचं....
तसं तुलाही ठाऊक आणी मलाही तू बोलशील लवकरच माझ्याशी....
थोडा वेळ शांतता...
तसं मनाला तुझ्या वाटतच असतं बोलावं खुप खुप माझ्याशी...
अन काही वेळाने बोलायचं मग माझ्याशी...
अगदी लडीवाळपणे..अगदी नेहमीच्याचसारखं...
जणुकाही तुला राग आलाच नव्हता कधि माझा....
अगदी तसं वागायचं माझ्याशी.....
माझं होऊन जायचं पुन्हा नेहमी सारखं.....
सारं सारं विसरून....
जमलं कधि तर... माझ्या डोळ्यांत बघ तेव्हा डोकावुन... किती आनंद असतो दाटलेला......
पुन्हा चिंब चिंब न्हाऊन निघालेला असतो मी तुझ्या प्रेमात तेव्हा ....
पण खरं सांगू ?खुप बरं वाटतं तुझं रागावणही मला.
तुझा राग गेल्यावर वाटतं... जणु तू पुन्हा एकदा नव्याने भेटलीस मला.
असं वाटतं आता पुन्हा नवी भेट....पुन्हा नवी ओळख....
पुन्हा नवी स्वप्नं....पुन्हा नवी क्षितीजं..........दीप

ओठ ओठांनीच भिजवायचे होते - गझल!

वृत्त - गालगागा गालगागा लगागागा
************************
ओठ ओठांनीच भिजवायचे होते
प्रेम प्रेमाला तुझ्या द्यायचे होते

मैफ़ल शब्दांची सुनी जाहली आता
हुंदका आला अजुन गायचे होते

जिंकलो मी मानली हार त्यानेही
आयुष्याशी अजुन भांडायचे होते

कोण माझे ना कुणाचा जराही मी
आज खोटेच मज रुसायचे होते

वाहताना आज वारा धुंद झाला
दीप विझला ज्यास अजुन जळायचे होते

श्वास अडखळले शब्दांचे अर्ध्यावरती
रंग अजुन गझलेस ल्यायचे होते

--संदीप सुरळे

कुणाची तू पोर

कुणाची तू पोर
करुन शृंगार
करितसे वार
नयनांचे

साडी भरजरी
डोईवर चरी
देतसे लचक
कमरेला

स्वर्गाची अप्सरा
मदनाचा वारा
लावण्याचा झरा
वाहतसे

मनात भरली
क्षणात ठरली
एक तुच परी
लावण्याची

देह गोरा पान
रुपाची तू खाण
हरवले भान
तुजठायी

काय तुझे नाव
कुठे तुझा गाव
घेतला तू ठाव
काळजाचा

--संदीप सुरळे

जमाव

काय...स्वप्नांना इथेही भाव नाही ?
हाय...स्वप्नांचा इथेही गाव नाही !

दाटला डोळ्यांत चंद्र आसवांचा
वाहण्याचा त्यांस इथे सराव नाही

हा वसंत असा कसा दाटून आला
बाग खुलली पण फ़ुलांना सुवास नाही

आसवे का दाटली डोळ्यांत तुझिया
तू दिला जो तो नवा मज घाव नाही

जिंकलि तू जेव्हा स्व:तस हरविले मी
मी हरेल असा एकही डाव नाही

श्वास देऊनी फ़ुलविली गझल ही मी
शब्दांचा हा नुसताच जमाव नाही

तुझी मैत्रि आहे म्हणुनच
जगण्याची जिद्द आहे
तुझ्या मैत्रितुन बाहेर पडलो तर
लगेचच मरणाची हद्द आहे

तुझी मैत्रि आहे म्हणुनच
आयुष्याचा हा प्रवास आहे
तुझ्या मैत्रिशिवाय
जगण्याचा नुसताच भास आहे

तुझी मैत्रि आहे
म्हणुनच तुझ्यासमोर दोन अश्रू ढाळू शकतो
वेड्या या जगात
जगण्याच्या मर्यादा मी पाळू शकतो

तुझी मैत्रि आहे....
माझ्यासाठी काळोखातही मिणमिणता दिवा
जग जळतं माझ्यावर
कारण माझ्याकडं आहे तुझ्या मैत्रिचा ठेवा

तुझी मैत्रि आहे
आशा आहे तुझी मैत्रि राहील
तुझी मैत्रि ठेव अशीच
मी अशीच तुला मैत्रीची सुमनं वाहील

गझल तुझ्या प्रेमात मी मशहूर केली

घेऊनी तू ओठ आणिक सूर गेली
देऊनी मज आसवांचा पूर गेली

मागितला मी गंध प्रेमाचा जरासा
उठवूनी का तू आठवांचा धूर गेली?

मन माझे हळवार अंगण चांदण्यांचे
सजवूनी तू का मनी काहूर गेली

उरलो थोडासा फ़क्त श्वासांत आता
घेऊनी तू आयुष्याचा नूर गेली

जाळूनी रात्रीं शब्दांना सजवले अन
गझल तुझ्या प्रेमात मी मशहूर केली

थांबू नको कधि तू

थांबू नको कधि तू
तुज चालणेच आहे
लाटा घोर जरी
लाटांवर तुज डोलणेच आहे

त्या सुर्यासही कधि
ग्रहण लागेल जेव्हा
होवुन काजवा
स्व:त तुज प्रकाशनेच आहे

किनारा पलिकडे
वाट तुझी पाहतो
पार करुन सागरा
पलिकडे तुज पोचणेच आहे

आयुष्य जिंकण्याचा
हा यज्ञ तुझा आहे
तुलाच तुझ्यासाठी
यज्ञात या झोकणेच आहे..

गझल माझी तुझ्या प्रेमात रंगली

असा संपलो आज की उरलोच नाही

जसा संपन्यातून कधि सरलोच नाही


पुन्हा रात आली अशी ही चांदण्यांची

पुन्हा चांदरात्रीत या फ़िरलोच नाही


जगाचा शहाणेपणा होता असा की

शहाणा त्यांच्यात मी ठरलोच नाही


कुणीही कुठेही काय बोलून गेले

शब्दास कधिही माझ्या मुकरलोच नाही


जरी जिवघेणेच होते खेळ सारे

पिसुन बैसलो काळजा कधि हरलोच नाही


अता माळून घेतले चंद्रास त्या तू

तुझ्या प्रेमात सांग मी झुरलोच नाही ?


गझल माझी तुझ्या प्रेमात रंगली अन

तुझ्या कवितेत कधि मी उतरलोच नाही

सोडुन मज जाशील जेव्हा

सोडुन मज जाशील जेव्हा वळुन मागे पाहू नकोस
गाव पेटेल माझा गावाच्या कोशीतही राहू नकोस

शब्दांच्या ओठी माझ्या गाणे उदास खुलतील
शब्दांसवे तेव्हा माझ्या तू गीत माझे गाऊ नकोस

ओढुन घे पदर अन नजर झुकव ही तुझी
मरणेही व्हावे मुश्कील मज इतुके तू भावू नकोस

सोडुन मज जाशील जेव्हा हरकत माझी नसेल
जाताना पण जगायला मज तू लावू नकोस

मी वेडा असा की सरणावरही श्वास घेइल
चेहरा तुझा अखेरीस मज तू दावू नकोस

झाले दु:ख जरी डोळ्यांआड लपव त्याला
चिता विझुन जाईल माझी अश्रु एकही वाहू नकोस

तू मला आठवशील

पावसाचे अगणीत थेंब कोसळतील तेव्हा तू मला आठवशील
माझे दोन अश्रु पावसात मिसळतील तेव्हा तू मला आठवशील

चंद्रासाठी चांदणी खुलेल चंद्रही तीच्यासाठी झुरेल
त्या रात्री मात्र मी एकटा असेल तेव्हा तू मला आठवशील

त्या कातरवेळी तुझ्या आठवणी पुन्हा वेढतील मजला
झेलताना त्यांचे वार असंख्य तू मला आठवशील

तुझ्याशिवाय जगणे झाले जरी आयुष्याचे
प्रत्येक क्षणास जगताना तू मला आठवशील

मी आटोपेल माझा संसार एकट्याचा
तुला हसताना पाहावसं वाटेल शेवटी तेव्हा तू मला आठवशील

तुझ्या मैत्रीचे क्षण....

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

ते एक गलबत ......

त्या गलबतास किनार्‍याची ओढ वाटली होती
किनार्‍याच्याही डोळ्यांत दोन आसवं दाटली होती

शीड फ़डफ़डले गलबताचे.... वारा भरला त्यात
सोडुन किनार्‍यास गलबत निघाले अथांग सागरात

अनंत मैलाच्या प्रवासास गलबताने सुरुवात केली
वाटेत शिदोरी म्हणुन किनार्‍याची आठवण साथ नेली

किनारा रडला खुप खुप.. आसवं त्याची ढळाली
सागरालाही त्या आसवांनी किंचीतसी भरती आली

गलबताचा प्रवास सुरु झाला मैल दर मैल
वाटतं होता प्रवास हा सहज संपुन जाईल

किनार्‍याची ओढ गलबताला छळु लागली
अन आठवण त्याची दिवसेंदिवस जाळु लागली

मला मिळालेला किनारा मी का सोडला?
'अजुन मला काय हवं होत?' असा प्रश्न त्याला पडला

पण आता खुप उशीर होत होता परतायला
अन वेळही लागला होता हातातुन रेतीसारखा सरकायला

दिवसामागुन दिवस सरत चालले होते
दोघंही एकमेकांपासुन झुरत दूर चालले होते

प्रचंड त्या लाटांत श्वास गलबताचे अडखळू लागले
किनार्‍याच्या भेटीस प्राण त्याचे तळमळू लागले

घोर काळरात्री खुप दाटुन गेल्या
जखमा काळजावर दोघांच्याही वठवुन गेल्या

खुप दिवस झाले....प्रवासास निघालेले गलबत परत नाही आले
कुणीतरी बोललं काल..त्या किनार्‍याचे कण कण वाहून गेले

कदाचित एखादं प्रचंड वादळ गलबतास घेऊन गेलं असेल
कदाचित एखाद्या महाकाय लाटेनं त्या किनार्‍यास वाहुन नेलं असेल.....कदाचित ....

झुकव नजर ही तुझी....

शब्द माझे

आता शब्दांनाही माझ्या सय
तुझीच जडली
शब्द माझे .... परी ते वेडे तुझ्यासाठी
फ़ुले जशी फ़ांदीची... तिलाच विसरून पडली

तुझी आठवण दाटुन आल्यावर
शब्दांचं कागदावर बरसण होतं
माझ्याचसारखे शब्दही माझे वेडे
त्यांचंही तुझ्या भेटीसाठी तरसणं होतं

मनास माझ्या शब्दांत जेव्हा
मी असे मांडू पाहीले
तस्वीर पुन्हा तुझीच उमटली
शब्दांशी मग खोटेच मी भांडू पाहीले

पाऊस दाटुन आल्यावर
शब्द माझे अजुन फ़ेर धरु लागतात
तुला अन मला भिजताना पाहुन
दिलखुलास माझ्यावर प्रित करु लागतात

चांदण्या रात्रि रातराणी खुलते
तू माझ्या शब्दांतुन माझ्या भेटीस झुरते
मन अगतिक,वेडावलेलं तुझ्या भेटीसाठी
अशा रात्रि मग शब्दांतुन तुझी भेट घडते

खट्याळ शब्द माझे
आजकाल माझ्याशीच परके होऊन वागतात
तडपत ठेवुन मला
स्व:त गंध तुझा घेत रात्र रात्र जागतात

असे हे शब्द माझे
आजकाल मलाच फ़ितूर होतात
प्रत्येक कवितेतून माझ्या
भेटण्या तुलाच आतूर होतात

तुझ्याचसाठी

जगणे हे वाटते फ़क्त तुझ्याचसाठी
मरण सुद्धा आता यावे तुझ्याचसाठी

विसरुन पाहीले तुला परी विसरु कसा
शराबी अता मी झालो तुझ्याचसाठी

होते काय माझे जे मी तुला देऊ
श्वासांनाच या विसरलो तुझ्याचसाठी

रंग बेरंगी...गंध गंधहीन झाला
प्राजक्त कधि बरसायचा तुझ्याचसाठी

रंग काजळला असा तुझ्या काजळाचा
जाळले जेव्हा मी मला तुझ्याचसाठी

आठवणी...

आठवणी जुन्याच का पुन्हा पुन्हा नव्या वाटु लागतात
जुन्या क्षणांना आठवुन हसर्‍या डोळ्यांतही का आसवं दाटु लागतात

प्रत्येक अश्रुबरोबर जणु एक एक क्षण आठवु लागतो
त्या आठवणी इतक्या गोड...आठवांची आसवंही मी साठवू लागतो

जरी प्रत्येक क्षण आयुष्याचा आपण वेगळाच जगत असतो
तरी तो क्षण आठवणीतुन परत यावा असा हट्ट करत असतो

आठवणी असतात त्या सप्तरंगी इंद्रधनुसारख्या.. कधितरीच दाटणार्‍या
श्रावण कोसळत असला जरी...फ़क्त त्याच छटा आपल्या वाटणार्‍या

माझ्या आठवणींना मी जपुन ठेवतो कधिच न विसरण्यासाठी
बरं असतं मग.....मन शुष्क झाल्यावर पापण्यांना बरसण्यासाठी

चारोळी-१

वाटते मनास माझ्या
मज तू इतके जवळ करावे
व्हावे काजळ मी
अन तू नयनि मला भरावे

तुझ्या नयनांचा तीर पहीला
काळजाच्या असा पार झाला
समजण्यापुर्वीच काही मी
मनावर प्रेमाचा हलका वार झाला

माझ्या दु:खांचा जेव्हा
मी बाजार मांडला होता
माझी दु:ख बघायला
सारा गाव भांडला होता

प्रेम करणं याला इथं
गुन्हा म्हणतात
मरायच्या आधिच
प्रेम करणारे हजारदा मरतात...

कोण आहेस तू....
सांगु कसे हे मी तुला
तो आरसाच फ़ितूर
दाखवी फ़क्त तुझा चेहराच तुला

फ़ना होते हुए तुझपर मर भी जाऊ अगर
मेरी मौत का तू गम ना करना
कुछ तो रिश्ता रख हमसे ए जालीम
मोहब्ब्त ना सही....पर नफ़रत हमसे तू कम ना करना

कफ़न ओढा देना लाशपर हमारे
जब ये उनकी गलीसे होकर निकलेगी
हमने तो कर दी है बंद
पर उनको देखने शायद ये आखें फ़िरसे खुलेगी

काजळी ही रात्र धुंद
तुझ्या मिठीचा ओलेला बंध
थांबावा क्षण इथचं हा...
तू अन मी ..साथीला हा श्रावण बेधुंद

काळोखच मला बरा वाटतो
तोच सार्‍या जगापासुन असतो मला वाचवत
माझाच चेहरा बर झालं
तो मला नाही दाखवत

तुझे डोळे बोलके बरचं काही बोलून जायचे
भेद तुझ्या मनीचे सारेच खोलून जायचे
शब्दांची गरज होतीच कुणाला
अबोल ओठच तुझे जणुन शब्दांची मैफ़ल व्हायचे

पायात रुते जर काटा
सल त्याची काळजास होई....
तरीही या बिचार्‍या काळजास
स्वत:हास काटा रुतवुन घेण्याची घाई.....

पून्हा पाउस आज कोसळुन गेला
मनात निजलेला आठवणींच्या समुद्रास तो फ़ेसाळुन गेला
तुझ्याशिवाय सावरलेल्या मला
एका क्षणात कसा ढासळून गेला

मी आहे थोडासा वेडा
मला थोडसं समजुन घे
रागावलो तरी...खोटचं तेही
रागास माझ्या तू उमजुन घे

माझं एकलंपण पाहुन
पावसाचा एक थेंब माझ्या तळहातावर उतरला
म्हटलं...एवढ्या दूरवरुन आला
अन माझ्या एकट्यासाठी बिथरला

पावसाचा थेंब कुठंही बरसला तरी
त्याला समुद्रालाच मिळायचं असतं
क्षणभराची ढगाची मैत्री तोडुन
समुद्राचचं नातं त्याला पाळायचं असतं

श्रावण आला निळ्याशार त्या अंबरातुनी
मेघ गेला एक सबंध रानभर बरसुनी
पुन्हा जागली नवलाई अन हिरवाई
सुरु जाहला खेळ..... क्षणात पाऊस क्षणात उन्हाची घाई...

मन भरुन आलं जुन्या आठवणींनी
आणी ते क्षण आठवले
म्हणत होतो मी मलाच रुक्ष
पण त्या क्षणांनी डोळ्यांत दोन आसवं दाटवले

आसवं माझी मी लपवून पाहीली
दु:खं माझी मी खपवून पाहीली
पावसात भिजण्यास गेलो
पापणी माझी बेफ़ाम होवुन वाहीली

खुप काही सोसावं लागतं
थोडंसं हसू मिळवण्यासाठी
हातभर दु:खांशी तडजोड
वितभर सुख उरी बाळगण्यासाठी

खुप काही सोसावं लागतं
तू दुर निघुन जाताना
कशा सांगु या मनाच्या वेदना
श्वास माझे मला सोडुन जाताना

खुप काही सोसावं लागतं
जेव्हा तुला आठवणं होतं
मग भुतकाळाच मनात दाटणं
अन आसवांचं पापण्यांआड साठवण होतं

माझ्या जगण्याला
माझ्या शब्दांचा आधार
सारं जग माझं
मी शब्दांवीना निराधार

मला दिलेली सगळी वचनं
जेव्हा तू सहज मोडली
अगदी तेव्हाच माझ्या श्वासांनी
माझि साथ सोडली

तू आणी तुझे शब्द सारखेच
कधिच वेळेवर येत नाहीत
मी मात्र वेडा
वेळ येण्याची कधि वाट बघत नाही

कधि मी आणी माझे शब्द
तुझ्यासाठी गीत गायचे
आज फ़क्त डायरी उघडुन
ते जुने शब्द वाचायचे

एक ना एक दिवस
माझ्या अश्रुंची किंमत तुला नक्की कळेल
पण कधी?
हं...कदाचीत मी जेव्हा सरणावर जळेल

मी आहेच जरा असा
शब्दांनी बेभान होणारा
श्वासांना माझ्याच परके
अन शब्दांना आपले म्हणनारा

पुन्हा माझे शब्द
आणी तुझ्या आठवणींची भेट झाली
पुन्हा डोळ्यांत या
आसवांची हलकी लाट आली

जगण्याची मुहुर्तमेढ
पुन्हा रोवुन बैसलो मी
अता घाबरु कुणाला
त्या मरणाकडे स्व:त धावुन बैसलो मी

प्रेम इथं नाकारलं जातं
तरीही कृष्णास इथं भजलं जातं
प्रेम असतं कुणाचं
पण भाळी दुसरचं कुणीतरी सजलं जात

पुन्हा एकदा
शब्दांची मैफ़ल सजवली मी
पुन्हा एकदा तुझी प्रित
माझ्या शब्दांत भिजवली मी

मी कुठे अजुन पत्ते उघडले
त्यांनीच डाव मोडला
मी जिंकणार इतक्यात
त्यांनी डाव सोडला

आता मलाही जमायला लागलं आहे
तुझ्याशिवाय जगणं
रात्रींचे दिवस करुन
स्वप्नांत तुला बघणं

ती वाट आणी ते वळण
कधिच नजरेआड झालयं
तुझ्यावीना जगलो आजवर
आता शेवटचं वळण आलयं

मी अखेरच्या वळणावर
आणी तुझ्या माझ्या हातात हात
तुला आपलं म्हणु तरि कसा
मरण माझं नेहमिच माझ्या साथ

जरा सांभाळुन ये
मला भेटायला येताना
जग टपलेलंच असतं
तू घरातुन बाहे्र निघताना

मी मरताना माझां गाव
माझ्यासमोर असेल सारा
मी एकटाच निपचीत पडलेला
एरवीचं वादळ...आज निर्मोही वारा

त्या वादळास मी सांगतो की
'तुलाच मी लुटणार आहे'
आज दिवस तुझा
उद्या मी सुटणार आहे!

जगायचं किती आणी कुठवर
रोज रोज तोच दिवस
रात्र सरते..पहाट होते....
पुन्हा एकदा जगण्याचे नवस

जरा सांज ढळू दे
सये चंद्रास थोडं जळू दे
मग दीप मालव
आणी ओठांना ओठांनी छळू दे

थोड्या विसाव्यानंतर
मी पुन्हा येणार आहे
मी एक झंझावात
मी कधि थांबणार आहे?

माझ्या अंगणाचा पारिजात
तुझ्यासाठीच खुलतो आहे
कधितरी तू येशील म्हणुन
वादळं आणी पाऊस झेलतो आहे

माझ्या वेदनांचा
मी कधिच बाजार मांडला नाही
तसं...माझ्या वेदना पहायला
कुणीच कधि भांडला नाही

आठवणी आठवुन जगावं
दु:खांचा बाजार जरा ओसरतो
नाहीच मिळालं काही तरी
आठवणींचा सुगंध आयुष्यभर पसरतो

तुझी आठवण आल्यावर
माझं माझ्याशिच खुदकन हसणं होतं
वेळ तेवढ्यापुरती निघुन जाते
अन पुन्हा माझ्याशी माझं रुसणं होतं

माझ्या आयुष्याचे कितीतरी क्षण
तू सोबत घेउन गेलिस
अन बदल्यात मला
तुझ्या छळवादी आठवणी देवून गेलीस

मी असे काय लीहीले
ज्यास ते जाळून गेले
त्यांची सारी पारायणं माझ्यासमोर
आज पुन्हा ते उगाळून गेले

तुझ्या विरहात तुझ्या आठवांचे
असे निखारे पेटले
तुला सुखाच्या झोपाळ्यावर झुलताना पाहुन
निखारेही मज चांदण्यासम वाटले

निखार्‍यांवरुन चालण्यास माझि
कधिच ना नव्हती
पण तुझी मात्र एकदाही
फ़ुलांवरुन चालण्यास हा नव्हती

अश्रुंना माझ्याच रागावलो मी
कधिही तुझ्या विरहात बरसत असतात
मी श्रावणात भिजताना
तेही बरसण्यासाठि तरसत असतात

सये तू जवळ नसताना
श्वास माझेच माझ्याशी परके होऊन वागतात
कदाचित माझ्यासवे तेही
तुझ्या आठवणींत मला विसरतात

सये तू नसताना
तुझ्या आठवणींत वेडापिसा होतो
मी घेतलेला प्रत्येक श्वास
सये, तुझ्याविणा नकोसा होतो

सये तू जवळ नसताना
तुझ्या असण्याचे भास
सये तू जवळ नसताना
माझे रीते रीते श्वास

सये तू जवळ नसताना
तुझ्या येण्याची चाहूल
तू येत नाहीस कधि
मनावर उमटतं तुझ्या आठवणीच पाऊल



सये तू जवळ नसताना
सारं जग वीरान वाटू लागतं
इवल्याशा मनात माझ्या
तुझ्या आठवणींचं प्रचंड आभाळ दाटू लागत

सये तू जवळ नसताना
मी कुठेचं नसतो
तू असताना मात्र
सारं जग विसरून तुझ्या डोळ्यातुन हसतो

सये तू जवळ नसताना
पाऊसही मला टाळून जातो
तो बरसतो रानभर
मला मात्र जाळून जातो

सये तू जवळ नसताना
मी जगावं कसं सांग ?
तुझ्यावीना माझ्या डोळ्यांनी
काही बघावं कसं सांग?


मी तुझ्याकडे पाहिल्यावर
ढळणारी सांज थांबली
तुझ्या ओठांची लाली मिळावी जरासी म्हणुन
तीही मुद्दामहुन लांबली

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
पुन्हा जगावसं वाटलं
तुझ्याशिवाय जगलेलं आयुष्य
पुन्हा मागावसं वाटलं

सये तू जवळ नसताना
चंद्रही नेहमीसारखा खुलत नाही
तुझा गंध घेतल्याशिवाय आता
सये रातराणीही खुलत नाही

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तुझ्या नजरेत नजर मिसळली
एरवी मंद होती
आता मात्र स्पंदनांची लाट उसळली

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
प्रेम काय असतं हे समजलं
क्षणभर वाटलं,
जगात सर्वात सुंदर प्रेम - जगाला अजुन नाही उमजलं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
नवी स्वप्न सजु लागतात
आयुष्यातली सारी दु:ख
सुखं होण्यासाठी धजु लागतात

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
वाटले, जणु हा जन्म कमी पडेल
तुझ्याशी प्रेमाचं हे नातं
आता जन्मोजन्मी जडेल

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
चंद्र बिचारा माझ्यावर जळत असतो
हुशार आहे पण तोही
ढगाआड जातो तो, मी जेव्हा तुझ्या मीठीत ढळत असतो

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
वाटतं, आता सारं थांबाव
फ़क्त याच एका क्षणानं
आता आयुष्यभर लांबावं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तू तरी कुठे स्वत:ची उरतेस
मी तुला पहावं पुन्हा पुन्हा म्हणुन
रोज माझ्यासाठी सजतेस

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
सारं जग फ़ितुर होतं
का ग राणी हे असं
सौंदर्याच्या नाशासाठी जग सारं आतुर होतं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
वाटतं, सारं आयुष्य तुला द्यावं
बदल्यात फ़क्त एकदा
मला तू तुझ्या मिठीत घ्यावं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
मन क्षणभर बावरलं
नंतर पटलं
बावरल्या मनाला तुच तर सावरलं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
माझाही मी उरत नाही
तुझ्याकडं पाहताना
या जगात मी मलाही धरत नाही

चारोळी-२

तु निमित्त आहेस म्हणुन
हा बाजार दु:खांचा आवरला मी
कडेलोट होणारा हा देह
तुझ्याचसाठी सावरला मी

तु निमित्त आहेस म्हणुन
मनात साठलेल्या आसवांचतरी डोळ्यांवाटे गळणं होतं
अरे दु:खां फ़क्त तुच माझा
पापण्यांत ओलावा आहे थोडासा हे तुझ्याचमुळे कळणं होतं

तु निमित्त आहेस म्हणुन
मी काट्यांनाही फ़ुलांचा गंध वाटतो
तुझ्यावीना मात्र
ऐन श्रावणातही माझ्यासाठी ग्रिष्म दाटतो

तु निमित्त आहेस म्हणुन
आयुष्याचा प्रत्येक क्षण सोनेरी आहे
तुझ्याशिवाय जगणं
हा विचारसुध्दा किती जिव्हारी आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
फ़क्त म्हणुनच मनाला थोडासा आधार आहे
तुझ्या मैत्रिशिवाय तसा
सगळ्यांचा असुनही मी निराधार आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
मरणाचही आता भय वाटत नाही
मरण माझं दारात उभं
अन मला तुझी सय सुटत नाही

तु निमित्त आहेस म्हणुन
मी या नियतीशी लढणार आहे
ठाउक आहे जरी मला माझ्या राखेवरुन
तु आयुष्याचा हा चढ चढणार आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
मलाच विझवुन घेतले मी
समोर चिता होती जरी
हसत जाऊन मला सजवुन घेतले

तु निमित्त आहेस म्हणुन
तोच डाव पुन्हा खेळणार मी
तू गेलीस जरी एक क्षणही
तुझ्या स्वप्नांतुन ना ढळणार मी

मुळासकट उखडुनसुध्दा एक झाड
तग धरुन होतं
स्व:त संपत असतानाही
कुणासाठी ते सावली करुन होतं

जेव्हा जेव्हा आवडली
मला एखादी कळी
तेव्हा तेव्हा नशीब म्हणालं
मला हवाय तुझा बळी

जगापासुन दूर झालं म्हणुन
एक पाखरू ऊंच आकाशात तडफ़डत होतं
जग त्याच्यापासुन दूर
म्हणे ते आनंदाने फ़डफ़डत होतं

प्रेम आहे
म्हणुनच इथं जगणं होतं
रात्रिंना जागुन
दिवसा स्वप्नांना बघणं होतं

प्रेम!
नुसती कल्पनाही सुखावुन जाते
आयुष्याच्या वळणावर प्रत्येक दु:खाला
आपल्यात सामावुन घेते

प्रेम!
प्रत्येकानं एकदातरी करुन पहावं
स्व:त जगतानाही
दुसर्‍यासाठी कधि मरुन पहावं

प्रेमाची भाषा जरा अवघड असते
सगळ्यांनाच समजत नाही
ज्यांना समजते
त्यांना जगाचे बोल उमजत नाही

प्रेमात असलनां
मग सारी दु:ख सुखं वाटु लागतात
एकटं असल्यावर मात्र
सारी सुखही कटु लागतात

प्रेमात देवाणघेवाण होत नाही
तिथं फ़क्त देणं असतं
स्व:तला विसरुन
दुसर्‍यासाठी जिणं असतं

प्रेम म्हणजे शांत वादळ असतं
ज्याला सगळेचजण झेलुन घेतात
प्रेम म्हणजे मरण असतं
ज्याच्यासोबत सगळेचजण खेळुन घेतात

प्रेमाची साथ असली ना
की काट्यांतुनहि चालणं होतं
प्रेमाला पाहुन मग
त्या काट्यांचही फ़ुलासारखं खुलणं होतं.......

चारोळी-३

माझ्या प्रत्येक शब्दात तू...
फ़क्त तुच उरली आहे..
तुझ्या शब्दांसाठी जगतोय
जिंदगी तशी कधिच सरली आहे....

या रस्त्यावर मी चालतो
एकटाच दुरवर.....
साथीला फ़क्त भास
आठवणी मनात खोलवर

तुझी आठवण झाली की
मी मलाच हरवुन बसतो
मग मोबाईल उघडुन
तुझे जुनेच एसएमएस वाचत असतो

तुझ्या आठवणी आल्यावर
जुन्या क्षणांचा मेळ सुरु होतो
आठवणी येत राहतात
अन शब्दांचा खेळ सुरु होतो

पुन्हा मला हसायचं आहे
पुन्हा मला जगायचं आहे
कुणालातरी वाहण्यासाठी
अजुन आयुष्य मागायचं आहे

बरं झालं शब्दांची तरी साथ आहे
थोडंस दु:ख वाटुन घ्यायला
नाहीतर सारखाच लागला असता
मला जाम भरुन घ्यायला

लाट आली की
लाटेबरोबर किनारा दुर वाहुन जातो
लाट फ़िरते माघारी
किनारा मात्र तिथंच राहून जातो

स्वप्नं आभासी असली
तरी बरी वाटतात
दिवस प्रत्येक खोटाच इथं
क्षणभर स्वप्नचं खरी वाटतात

आयुष्य जगायची ती वाट आता नको
आयुष्य जगताना कोणतीच अट आता नको
सराव झाला मला काळरातींचा
प्रेमाची कोणतीच पहाट आता नको.........

तुझ्यानंतर तुला आठवणं
आता नित्याचं झालय....
तुझ्या आठवणींत रात्रींना जळतो
ते पण आता सरावानं आलयं.........

कविचं आयुष्य खुप सोपं असतं
दु:ख शब्दांच्याआड लवपता येतात
निखळलेच दोन अश्रु चुकुन तरी
शब्दांची झालर चढवुन तेही खपवता येतात

माझि मैत्रिण म्हणुन तुझं असणं
म्हणजे वाळवंटातही एखाद्या फ़ुलाचं खुलणं
तुझि मैत्रि आहे सई म्हणुनच होतं
क्षणभर आयुष्याच्या हिंदोळ्यावर ह्सत खेळत झुलणं

तुझी मैत्रि आहे म्हणुन
या मृगजळासही अस्तित्वाचा भास
एरवी मात्र.......
एका अनोळखी वाटेनेनुसता अखंड प्रवास

(Reply for above lines by one of my best friend)
तू मृगजळ म्हणतोस स्वतला
जे मिळवता येत नाही कुणाला
पण तुझी मैत्री लाभावी म्हणून
वाळवंटात राहणही चालेल मला.....................

तु निमित्त आहेस म्हणुन
या वाळवंटातही जगणं होतं
एरवी मात्र
ऐन श्रावणातही या मनाच जळणं होतं

तु निमित्त आहेस म्हणुनच फ़क्त
मी माझा आहे
तुझ्याविना मात्र
जिवन जगणं फ़क्त एक सजा आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
आयुष्य नवी उभारी घेऊ पाहतं
तू साथ असल्यावर
मरणही क्षणभर दूर उभं राहतं

तु निमित्त आहेस म्हणुन
जगण्याची आस आहे
तु नसलीस तरी या मनात
तुझी आठवण खास आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
कणाकणाचं मरणंही मला पसंत आहे
तुझ्या आठवणी आहेत म्हणुनच
या ग्रिष्मातही जणू वसंत आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
जिंकलो असा जरी हारलो मी
तू गेलीस अन
जिंकुनही असा सरलो मी

चारोळी-४

सागराला ओढ किना-याची
तर किना-याला भिती वाहुन जाण्याची
कशी ही एकेरी नाती
या वेड्या मनांची

रुपेरी किनार असली तरी
ढग पांढरा शुभ्र नसतो
बाहेरुन सोनेरी दिसणारा ढगही
आतुन काळोखाने भरलेला असतो

जीवनाचा प्रत्येक क्षण
आपल्याला काहीतरी देत असतो
पण नकळतपणे
आपल्या आयुष्याचा
एक क्षण तो घेत असतो

जुळले काही शब्द
पुन्हा चार ओळी झाल्या
नसलीस तु जरी
आठवणी तुझ्या तुलाच घेउन आल्या

आता मीही
तुला सांगायचं टाळतो
प्रेमाची तुझी रीत
आता मीही तुझ्यासारखीच पाळतो

एकदा तुला म्हटलं होतं
आयुष्यभर तुझी साथ देइल
मला कुठं ठाउक होतं तेव्हां
आयुष्यचं माझी साथ सोडुन जाइल

जेव्हा सा-या जगाचं
माझ्याशी रुसणं होतं
तेव्हां क्षणभर परकं होऊन
स्वत:चचं स्वत:शी हसणं होतं

प्रत्येकाच्या मनात
आठवणींचा एक कपा असतो
जुन्या क्षणांना विसावण्यासाठी
मनानं बांधलेला खोपा असतो

पाऊस आला की
पावसाच्या आठवणींत बुडतो
अन पाऊस गेला की
आठवणींचाच पाऊस पडतो

पावसात चालायला मला खुप आवडतं
पावसात भिजायला मला खुप आवडतं
लोक मला वेडे म्हणतात
पण याच पावसात मला माझं बालपण सापडतं

मित्रांचं
सोबत असणंही खुप होतं
सोडुन जाताना
मनातल्या मनात रडु येतं

मैत्रि...
शब्द तसा लहान आहे
पण आत दडलेला अर्थ..
शोधता आला तर खुप महान आहे

जरा जपुन
आता चंद्राचीही तुला नजर लागेल
मला भेटायला आल्यावर
तोही तुझ्याशी परक्यासारखा वागेल

वाटतं...
तुझ्याकडं असचं पाहत राहावं
आपलं आयुष्य एकदाच तुला देऊन
कायमचं तुझं होऊन जावं

एरवी छळणा-या वा-यास विचारलं मी
का रे बाबा...आजकाल नुसताच वाहुन जातोय?
वारा म्हणाला...
वेड्या मी तुझ्या घराचं माप घेतोय

पहिला पाऊस आला
तुझी आठवण करून गेला
तुझ्यावीणा सखे...
माझ्याबरोबर तोही रडुन गेला

पहिला पाऊस म्हणजे
जणु पहीलं प्रेम असतं
कीतीही भिजलं त्यात तरी
मन भरत नसतं

तु नसलीस तरी
क्षणोक्षणी तुझा भास आहे
तुझ्या आठवणी आहेत म्हणुन
आजवर माझा श्वास आहे

कोणत्या प्रश्नांची
तुला कीती उत्तरं देऊ?
जग सारचं फ़ितुर इथं
मी नाव कुणाचं घेऊ?

पावसाचा एक थेंब म्हटला
मला तुझं थोडंसं आयुष्य हवं आहे
मी म्हटलं..अरे वेड्या
मीच अळवावरचं दव आहे

चारोळी-५

ऋतु क्षणात असा पालटुन गेला
ऐनवेळी आज कसा श्रावण आला?
ग्रिष्मातही मी वेडा, न्हाऊन निघालो चिंब
पाहुन डोळ्यांत तुझ्या, माझेच प्रतिबिंब

पाउस आल्यावर चंद्र
जरासा ढगाआड लपतो
तोही तुझ्याचसारखा..
स्वत:चं नाजुकपण जपतो

प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर शोधायचं नसतं
आणि उत्तर येत असुनही
कधिकधि अनुत्तरित व्हायचं असतं...

उद्याची वाट कशी पाहु?
मी तुला कसे समजावु?
उद्याचा भरवसा नाही सखे...
चल आजच जगुन घेऊ....

पुन्हा मेघ तो एक गरजुन गेला
पुन्हा श्रावण तो मज तरसुन गेला
मी राहीलो कोरडाच इथे
अन तो सा-या रानभर बरसुन गेला

मैत्री .... एक नाजूक धागा
हा दोघांनी जपायचा....
.एकानं तोडला तर
दुसर्‍यानं जोडायचा.....

दोन शब्द बोल मित्रा
इतर काही मागत नाही...
तुझी मैत्री असल्यावर
आयुष्य जगायला दुसरं काही लागत नाही...

आकाशातील तारासुध्दा
माझ्याशी आता परक्यासारखा वागतो...
मागणं माझं काहीच नसतं
तो मात्र रोजच तुटतो..

श्रावण....
येताना खुप पाउस घेऊन येतो
अन जाताना
पावसाइतक्या आठवणी देऊन जातो...

पावले चालत राहीली दुरवर
पाउलवाट मागेच अडखळुन पडली...
साथीला होते कोण कधि?
नाती सारी कधिच गळुन पडली...

सारेच जण इथं
एक कायदा चोखपणे बजावतात
जिवंत माणसाला जाळुन
मेल्यावर त्याचं प्रेत सजवतात

तु गप्प रहा अशीच
तुझ्या डोळ्यांनाच बोलु दे...
तुझ्या डोळ्यांची मुक भाषा
माझ्या डोळ्यांना कळु दे...

आता तो रस्ताही मूक झालाय
ज्यानं आपण चालायचो...
आज तु गप्प ...मीही गप्प...
कधि आपण त्या पानाफ़ुलांशी बोलायचो

माझ्या मनाशी होणारा संवाद ही
आता मी टाळतो
आजकाल माझ्याशीच
मी मुक होऊन वागतो

सांज ढळते
तुझ्या भेटेची आस अधिक छळते
ये निघुन प्रिये तु....
ठाऊक मज तुही माझ्याच आठवणींत जळते

पावसात भिजुन घेतो
मी पावसाशी हसुन घेतो
पावसातच अश्रु लपतात माझे
म्हणुन पावसाशीच मी रडून घेतो....

तु फ़क्त सोबत रहा मित्रा
हे आयुष्य असचं जगुन घेईल..
.मागितलंस कधि तर
सारं जगही जिंकुन तुला देईल...

सुर्य ढळला....आता चंद्र येईल
अन सबंध आसमंत त्याच्या मंद प्रकाशात न्हाऊन जाईल...
माझ्याही शब्दांना मग उधान येईल
आठवुन तुला...पुन्हा अशीच एखादी कविता जन्म घेईल...

कधि कधि माझचं लिहीणं
मला पटत नाही
शब्दांत मांडलेलं मनाचं कोडं
मग मलाच सुटत नाही

आयुष्यभर रडू नकोस
माझ्यापासुन दूर झाल्यावर
पण एक अश्रुतरी ढाळ
मला सोडुन चालल्यावर

चारोळी-६

तु समोर असलीस की
सारं जग परक होतं
एरवी आभळ पेलणारं मन
तेवढ्यापुरतं हलकं होतं

तु समोर असलीस की
पहिल्यापासुन जगावसं वाटतं
सारं जग तुझ्या नजरेनं
नव्यान बघावसं वाटतं

तु समोर असलीस की
मी मलाही परका होतो
तु फ़ुल अन मी
फ़ुलपाखरासारखा होतो

तु समोर असलीस की
वेळेचं भान उरत नाही
तुझ्यासोबतचा एक क्षण
युगं न युगं सरत नाही

तु समोर असलीस की
नुसतचं तुला पाहणं होतंअ
न तु गेल्यावर
शब्दांतुन तुला लिहीणं होतं

एक फ़ुलपाखरु
हलकेच हातावर येऊन बसलं
मला पाहुन तेही
तुझ्यासारखं खुदकन गालात हसलं

ए पावसा...
तु जा अन माझ्या प्रियेला भिजवुन ये
माझ्या वतीनं माझं प्रेम
तीच्या मनात रुजवुन ये

तु समोर असलीस की
डोळ्यांत तुझं साठणं होतं
मग तु नसताना
डोळे बंद करुन स्वप्नांत तुला भेटणं होतं

तुला बघुन
फ़ुल उमलुन येत
तेही जणु तुझचं
नाजुकपण घेत

मरण्याआधी माझी चिता
मलाच सजवायची आहे
आयुष्यातली शेवटची कामगिरीसुध्दा
मलाच बजवायची आहे

तु समोर असलीस माझ्या
की श्रावणही तरसु लागतो
विसरुन नियम त्याचे
तो ग्रिष्मातही बरसु लागतो

तु समोर असलीस की वाटतं
माझं सगळं तुला द्यावं
बदल्यात तुझ एक
फ़क्त एक हसु घ्यावं..

आठवतं तुला...
आपण दोघं पावसात भिजायचो
गारठुन गेल्यावर मात्र
एकमेकांच्या मिठित थिजायचो...

असंच एखाद्या दुपारी
आठवणींच आभाळ मनात दाटु लागतं
ग्रिष्मातलं उनही मग
श्रावणातलं वाटु लागतं

पुन्हा सांज आली
याद तुझी पुन्हा झाली
तुजवीन प्रिये...
जिंदगी माझी मलाच पोरकी झाली

तुझ्या गावची
रितच आगळी आहे
येथे कुणी न माझे
तुही वेगळी आहे

तुझी वाटेतली भेटही
आता मी मुद्दाम टाळतो
तु गेल्यावर माझं काय?
या विचारानं आजकाल मी मलाच जाळतो

पुन्हा आली ही कातरवेळ
मनात एक हूरहूर दाटवण्यासाठी
जुन्या आठवणींतली अशीच एक
आठवण आठवण्यासाठी

खुप खुप कोसळतो जरी
पाऊस आपल्या दोघांनाही हवा आहे
तुझं प्रेम मला नी माझं प्रेम तुला देतो
आपल्या प्रेमाचा हा दुवा आहे

ही हवा गुलाबी
जणु तुज स्पर्शुन आली
होतो मी कोरडा कधिचा
मज ती भिजवुन गेली

चारोळी-७

पावसालाही
तुझ्या पावलांची चाहुल
तुझं मला भेटायला येण्याच्या आत
त्याचं माझ्या दारात पाऊल

पावसाला सांगतो मी
माझ्या घरी तु येऊ नकोस
वाळवंटी जीवनाला
श्रावणाची जुनी आठवण तु देऊ नकोस

पाऊस आणि आठवणी
एकमेकांशी मैत्रि करतात
तसे दोघेही माझेच
पण मग मात्र माझे शत्रु बनतात

झाडाचं तुटलेलं एक पान
दुर दुर ऊडत होतं
झाडापासुन दुर झालं म्हणुन
ते खुप खुप रडत होतं...

कातरवेळ आली की
तुझ्या आठवणींचं छळण होतं
मग माझ्या मनाचं रडणं
आणी अश्रुंचं पापण्यांआड दडणं होतं

आठवणींच्या मैफ़लीत माझ्या
असचं तुझं येणं होतं
मुक शब्दांचंही माझ्या
मग सप्तसुरेल गाणं होतं

दिव्याखाली अंधार असतो
पण हे त्याला कळत नाही
स्व:त अंधारात असला तरी
स्व:तसाठी तो कधिच जळत नाही...

तुझ्याशिवाय जगणं
आता जिवावर आलयं
तुझ्या आठवणी रोज मारतात
मरण मात्र दुर झालयं

दोन पावलं चालायचं असेल फ़क्त
तर आत्ताच माझा हात सोड
आयुष्यभर नसेल टीकणार
तर मनावरुन माझं नाव कायमचं खोड

प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब
तुझी आठवण सजवुन जातो
बदल्यात मात्र स्वत:ला...
माझ्या अश्रुंत भिजवुन घेतो

खाली पडायच्या आधी क्षणभर
दव पानावर थिजुन घेत...
वेडं पान मग
पाउस समजुन दवातच भिजुन घेतं

तु गेल्यावर
मी खुप खुप रडुन घेतलं
बहरुन आलेल्या झाडानं
ऐन श्रावणात झडुन घेतलं

तु म्हणालीस म्हणुन...
आयुष्यात तुला कधिच नाही आठवणार
पण तुझ्यानंतर पोरक्या झालेल्या या मनास
कुणाकडचं नाही पाठवणारं

रात्र सरायला लागली की
पहाटेची स्वप्न फ़ुलतात
माझ्या आयुष्याच्या सा-याच वाटा
तुझ्या नयनी येऊन संपतात

तुझ्यासाठी
मी रात्रभर जागत असतो
एखादा तारा तुटताना दिसेल
म्हणुन एकटक आकाशाकडं बघत बसतो

वा-याची मंद झुळुक
पावसाची धुंद लहर
जीवनाच्या वाटेवर कधिकधि
असाच तुझ्या आठवणींनाही बहर

आयुष्य...
दिसताना एक भकास पडलेलं रान
पण पाहता आलं तर
वाळलेलं पण जाळीदार पान

समुद्राच्या दोन्ही किना-यांना
मला एकत्र आणायचंयं
त्यासाठी समुद्राच्या मध्यावर उभं राहुन
दोन्ही किना-यांकडं एकदाच बघायचयं

समजावलं खुप त्याला मी
त्याच्या मार्गातला फ़ुल बनलो अन काटाही कधि
पण त्याचं आपलं वेगळचं
जीवन म्हणे माझं सारं काही निराळचं

समुद्राला मिळाली की
नदी स्वत:चं अस्तित्व विसरते
हे तिला ठाऊक असुनही
ती जाऊन समुद्रात मिसळते

चारोळी-८

तुला आठवणं म्हणजे
तुला पाहणं आहे
क्षणभर का होईना
पण भुतकाळात जाऊन तुझ्यासोबत राहणं आहे

गुलमोहराचं वागणंही
आठवणींसारखचं असतं
सा-या जगात उन्हाळा पेटतो
अन मग हा एकटाच फ़ुलांनी दाटतो

प्रत्येक संध्याकाळी
तुझ्या आठवणींची मैफ़ल भरते...
ही मैफ़लच नंतर
एक गोड आठवण बनुन सजते

पावसाचं अन माझं
आजकाल पटत नाही
तो आला तरी त्याच्यासोबत खेळायला
मला माझं घर सुटत नाही

रोज पडणारा पाऊसदेखील
मला रोजच नविन वाटतो
प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब
मनात एक आठवण बनुन साठतो

पावसालाही
तुझ्या पावलांची चाहुल
तुझं मला भेटायला येण्याच्या आत
त्याचं माझ्या दारात पाऊल

पावसाला सांगतो मी
माझ्या घरी तु येऊ नकोस
वाळवंटी जीवनाला
श्रावणाची जुनी आठवण तु देऊ नकोस

पाऊस आणि आठवणी
एकमेकांशी मैत्रि करतात
तसे दोघेही माझेच
पण मग मात्र माझे शत्रु बनतात

झाडाचं तुटलेलं एक पान
दुर दुर ऊडत होतं
झाडापासुन दुर झालं म्हणुन
ते खुप खुप रडत होतं...

कातरवेळ आली की
तुझ्या आठवणींचं छळण होतं
मग माझ्या मनाचं रडणं
आणी अश्रुंचं पापण्यांआड दडणं होतं

आठवणींच्या मैफ़लीत माझ्या
असचं तुझं येणं होतं
मुक शब्दांचंही माझ्या
मग सप्तसुरेल गाणं होतं

दिव्याखाली अंधार असतो
पण हे त्याला कळत नाही
स्व:त अंधारात असला तरी
स्व:तसाठी तो कधिच जळत नाही...

तुझ्याशिवाय जगणं
आता जिवावर आलयं
तुझ्या आठवणी रोज मारतात
मरण मात्र दुर झालयं

दोन पावलं चालायचं असेल फ़क्त
तर आत्ताच माझा हात सोड
आयुष्यभर नसेल टीकणार
तर मनावरुन माझं नाव कायमचं खोड

प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब
तुझी आठवण सजवुन जातो
बदल्यात मात्र स्वत:ला ...
माझ्या अश्रुंत भिजवुन घेतो

पावलोपावली
तुझी साथ आहे
दूर असलीस तरी
क्षणोक्षणी तुझाच भास आहे

तुझ्याकडं पाहताना
मनातलं बोलायचं राहुन गेलं
श्रावणाची वाट पाहताना
आभाळ कधिच वाहुन गेलं

तुझं सगळं तु मला दिलं
तुझं असं काही उरलं नाही
नशीब माझंचं फ़ाटकं
तुझं सगळंही मला पुरलं नाही

तुझ्याच केसांचि एक बटही
आपल्या प्रेमास नडली
तुझ्याकडं पाहताच येऊन
तुझ्या गालावर पडली

तुझ्या घरासमोरील गुलमोहरही
माझ्यासारखाच वेडा आहे
पावसाळा कधिच सरून गेला
तरी अजुन त्याला आकाशाचा ओढा आहे

चारोळी-९

शब्द माझे असतात उनाड वा-यासारखे
अन कधि रिमझिमत्या श्रावणसरिसारखे
दोन क्षण घेतो विसावा कुणी कधि येथे...
मग होतात शब्द माझे खळखळणा-या झ-यासारखे...

शब्दांना जुळायला वेळ लागत नाही
शब्दांना कळायला वेळ लागतो
शब्दांशी खेळताना
मनाशी भावनांचा खराखुरा मेळ लागतो

शब्दांशी शब्द जुळतीलच असं नाही
शब्दांनी शब्द पेटतीलच असंही नाही
तरीही शब्दांना बांधावच लागतं
भावनांचा खेळ खेळताना शब्दांच्या कुशीत शिरावचं लागतं

शब्दांशी मैत्रि असावी
म्हणजे हवं तसं जगता येतं
जग रडत असलं बाहेर
तरी एकट्याला हसता येतं...

तुझी मैत्रि आहे म्हणुन
या मृगजळासही अस्तित्वाचा भास
एरवी मात्र.......एका अनोळखी वाटेने
नुसता अखंड प्रवास

असं वाटतं आता शब्दांचीही साथ सुटेल
आणी मी पुरता एकटा होईल....
'आता कुणासाठी जगतोयसं?' असं म्हणत...
आयुष्य क्षणोक्षणी चटका देईल...

आयुष्यभर चातक बनुन
मी पावसाची वाट पाहीली
पण...या वाळवंटात मात्र
फ़क्त माझीच पापणी वाहीली...

अशा धुंद श्रावणात बेधुंद रात येते
छेडीत सप्तसुर थंडी गुलाबी गीत गाते
शरीरे दोन जरी...सूर त्यातुन एकच उमटे
मी गंध तुझा...तु रातराणी... मज सोडुन का जाते?

तु समोर असलीस की
सा-या जगात मी
अन तु गेल्यावर मात्र
शोधात माझ्याच मी

सांज ढळली...तारा तुटला...
मनात आशेचा एक अंकुर फ़ुटला...
समजावले मनास मीच
अरे वेडया...जगणे त्यास असह्य झाले
म्हणुन तोही निखळत सुटला...

एकदा तुला म्हटलं होतं
आयुष्यभर तुझी साथ देईल...
मला कुठं ठाऊक होतं तेव्हां
आयुष्यचं माझी साथ सोडुन जाईल

जखम झाली तरी
तीला मी वाहु देत नाही
माझी जखम मी
जगाला पाहु देत नाही

तुझ्या राज्यात मला
थोडीशी जागा दे
राजा म्हणुन नको
पण....प्रजा म्हणुन तरी मला तुझ्या राज्यात घे

कुणाला भेट म्हणुन काही दिलं की
त्याच्यावर मी माझं नावं टाकत नाही
कुणीतरी मला 'ऊगीचच' आठवावं
असं मी मुळीच वागत नाही

जुळले काही शब्द
पुन्हा चार ओळी झाल्या
नसलीस तु जरी
आठवणी तुझ्या तुलाच घेऊन आल्या...

तु फ़क्त सोबत रहा मित्रा
हे आयुष्य असचं जगुन घेईल...
मागितलंस कधि तर
सारं जगही जिंकुन तुला देईल...

सुर्य ढळला....आता चंद्र येईल
अन सबंध आसमंत त्याच्या मंद प्रकाशात न्हाऊन जाईल...
माझ्याही शब्दांना मग उधान येईल
आठवुन तुला...अशीच एखादी कविता पुन्हा जन्म घेईल...

उद्याची वाट कशी पाहु?
मी तुला कसे समजावु?
उद्याचा भरवसा नाही सखे...
चल आजच जगुन घेऊ....

आभाळास पेलुन घेइल
मी वादळास झेलुन घेइल
तु फ़क्त साथ रहा..
क्षणभर मृत्युशीही खेळुन घेइल..

अशी वरवरची हाक नकोय
मनापासुन मला साद घाल...
अवघं आयुष्य तुला देईल
एकदा माझ्या भावनांना हात घाल

माझे जेव्हा सरण पेटले होते...

मज भेटले ते सारे श्रावण कोरडे होते
अन पाहिले मी जे ते स्वप्न भंगले होते

अपराध ना आठवतो मज होता काय घडला
गेलो जिथे मी त्यांनी काटे पेरले होते

नशिब फ़ुटके भेट तुझी न माझी उशिराच झाली
तुज भेटलो मी जेव्हा मज मरण भेटले होते

मज पाहण्या जळताना गाव असा लोटला होता
त्यांना उब दिली माझे जेव्हा सरण पेटले होते

तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...पण...हातात माझ्या हक्काच असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...म्हणुनच वाटतं...
तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलोच तुझ्यासोबत तरी माझे शब्द असतील
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच देऊ शकतो तुला खात्री...

रिमझिम पाउस आला गं सखे

रिमझिम पाउस आला गं सखे
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे

तु अन मी...
अन पाउस हा
गारा पुन्हा त्याच्या चल झेलु गं सखे
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे .....

हवा गुलाबी मस्तीत आली...
विसरुन भान आपणही
बेभान पुन्हा होवु गं सखे...
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे

चंद्र ढगाआड दडला
इंद्रधनु सप्तरंगांनी खुलला
रंग त्याचे आपणही चल लेऊ गं सखे
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे

पोरका हा श्रावण
भेटण्या धरतीस आला
प्रेम आपलेही थोडे चल त्याला देऊ गं सखे
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे

माझी दु:खे


माझ्या दु:खांचा मला बाजार मांडायला नाही आवडत
माझ्याच दु:खांशी मला भांडायला नाहि आवडत

साथ माझीच मला देऊन रडून घेतो मी
जगासमोर एक अश्रुही मला सांडायला नाहि आवडत

ठाऊक आहे फ़क्त दु:खेच माझी साथ माझ्या
कुणा आपल्यांच्या शोधात मला हिंडायला नाही आवडत

अजुन जगायला हवं


अजुन जगायला हवं
जग अजुन बघायला हवं
सोसलं नाही अजुन जास्त...
एवढ्यात मरण नको...
अजुन मला सोसायला हवं

कुणीच नसलं जरी
बाजार दु:खांचा मांडलाच आहे
दु:खे माझीच सारी
दु:खांना या मलाच पोसायला हवं

आपल्याच एका क्षणावर
आपल्याच एका श्वासाचा अधिकार
इथं कोण कुणाचा असतो?
मी सांग कुणाला कोसायला हवं?

गीत माझे सूर तू छेड यारा

गीत माझे सूर तू छेड यारा
सूरात तुझ्या सूर माझा
शब्दांस माझ्या शब्द तू जोड यारा...

ही रात्र काजळी पुन्हा ढळून जाईल
तू हास आज
हासणे तुझे वाटे गोड यारा...

भरवसा उद्याचा सांग कुणी कुणास द्यावा?
तू घे जगुन आज
बंधने सारीच तोड यारा...

तू हो कवडसा सुखाचा तुझ्याचसाठी
दु:खे पडद्यामागे लपलेले
दूर त्यांना तू सोड यारा...

निघुन गेलो जरी कधि मी
राहील शब्दांच्या रुपाने सदा
नाते शब्दांशी माझ्या तू जोड यारा...

मन मनास उमगत नाही


मन मनास उमगत नाही
तगमग हि कुणास समजत नाही
हा शोध कुणाचा? कुठवर?
जो कधिच संपत नाही....

भेटले आजवर कुणी जरी
मृगजळ भासले सारेच
शोध पुन्हा तोच सुरु
जो कधिच संपत नाही....

बंदिस्त मनास माझ्या
तोडुन वाट शोधली
वाट ही पुन्हा त्याच शोधाची
जो कधिच संपत नाही

स्वप्नांत माझ्याच हरवते
नाही बघायची स्वप्न असंही ठरवते
पण अंधार दाटला नेहमीच
जो कधिच संपत नाही

पाऊलवाटा हळुवार होत्या
त्या कधिच दूर झाल्या
हा प्रवास अखंड आता
जो कधिच संपत नाही

तोच समुद्र पुन्हा

तोच समुद्र पुन्हा
अन पुन्हा तीच लाट
एकटाच मी या किनारी

सुनी सुनी तुझी वाट
या वाळुतलं घरटं
कधिच वाहून गेलं
तुझ्यासोबत सजवलेलं प्रत्येक स्वप्न
स्वप्नच राहुन गेलं
याच समुद्राची लाट
तुला खुप आवडायची
लाट आल्यावर मात्र
घाबरुन मला बिलगायची
गहि-या डोळ्यांत तुझ्या
समुद्र असाच साठला होता
जगलो त्यालाच पाहुन आजवर
अन किनारा त्याचा गाठला होता
पण......पण वाटल नव्ह्तं कधि
तोच समुद्र असा आटुन जाईल
धरुन आहे त्याचा जो किनारा
त्याच किना-याची अशी साथ सुटुन जाईल

वारा


वारा आला हा असा
गाणे तुझेच गायी
सुरेल हलकी झुळुक त्याची
तुच भासे मज ठायी ठायी
तुही अशीच होतीस कधि
याच वा-यासारखी
म्हणायचीस मला फ़ुल
अन तु फ़ुलपाखरासारखी
उनाड वारा आज हा
असा मज खिजवुन गेला
आठवणी तुझ्या दरवळल्या
आठवणींत ह्या मला भिजवुन गेला
आठवत तुला...याच वा-यासवे
आपणही कधि भनानलो होतो
घेऊन कवेत यास मुक्तपणे
नभि आपण विहारलो होतो
तू नसलीस जरी आज
तरी माझे या वा-यात येणे होते
रौद्र त्याच्या आवाजात
माझ्या हुंदक्याचेही मौन होते

पुन्हा तुला मी मैत्रिण म्हणुन मागेल

आता तुझं ते भेटणं नाही
दिलखुलास तुझं ते हसणं नाही

निरागस,नितळ वागणं तुझं मनात घर करुन गेलं
अन तुझं बोलणं कितीतरी आठवणी पेरुन गेलं

हसलो मी तुझ्यासोबत अन रडतानाही तुझाच साथ होता
जगलो मी खुप...हातात माझ्या तुझ्या मैत्रिचा हात होता

आठवतो तुला मी अधुन मधुन त्याचा राग नको मानुस
फ़क्त तुझ्या आठवणी आहेत..त्या तू परत नको मागुस

जगाला हसवत स्वत:चे अश्रू पिणारी तू
अळवावरच्या दवालाही तळहातावर घेणारी तू

तू माझं 'श्रद्धा'स्थान अन तुझी मैत्रि माझी 'श्रद्धा' होती
मी निवडुंग...पाहुन तुला...क्षणभर जगलो तू असं रानफ़ुल होती

आठवण तुझी आजही हळव्या मनास आहे...मग सांग मी कठोर कसा ठरलो
अगं...हे नखरे जीवनाचे, मैत्रित कधि मी न मागे सरलो

पुढच्या जन्मातही पुन्हा तुला मी मैत्रिण म्हणुन मागेल
हा जन्म अपुरा पडला पुढच्या जन्मी पुन्हा तुझा मित्र होऊन जगेल

पुन्हा आठवणी आल्या


आठवणींतच नेहमी
मला जगावसं वाटतं
सारं जग परकं इथं
आठवणींतच कुणीतरी माझं मला भेटतं

सा-या जगाचं परकेपण पाहुन
मन रडु लागतं
मनाला समजावण्यासाठी मग
आठवणींना आठवावसं वाटतं

आठवणींना विसरलो असतो
तर आजवर जगलो नसतो
आठवणींना आठवता यावं खुप
म्हणुन अजुन मला जगावसं वाटतं

पुन्हा आठवणी आल्या
मनात आठवणींची दाटी झाली
मनात दाटलेल्या आठवणींना
डोळ्यांत मला साठवावसं वाटतं

कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणाला कुणी असं सोडुन का जातं?
रेशमी वाटणारी घट्ट नाती कुणी तोडुन का जातं?

मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?
जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?
कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास
काट्यांतच मग खुडावं लागतं.....
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं
बरसतानाच नकळत हरवुनही जातं
भर चांदरातीही मनास मग
एकट्यालाच झुरावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये
झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये
वाळवंटी या जगात
एकट्यालाच मग जगावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मी जगुन घेतो एकटा
माझ्याशीच मी हसुन घेतो एकटा
तरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कवि होऊन जगतो मी

ओरडावसं वाटलं की
मेघ होऊन गरजतो मी
तहानल्यागत वाटलं की
श्रावण होऊन बरसतो मी

होऊन चंद्र चांदराती
चांदण्यांत कधी हिंडतो मी
रुसुन माझ्यावर
माझ्याशीच कधी भांडतो मी

दु:ख जगाची
शब्दांत माझ्या बांधतो मी
देऊन प्रेम
दुभंगलेली मनं सांधतो मी

मनास माझ्या
कागदावर उतरवतो मी
'सुंदर कविता...!' जग म्हणते
माझ्याशीच मग हासतो मी

दुर त्या जगाकडं
जेव्हा बघतो मी..
विसरुन मला
पुन्हा कवि होऊन जगतो मी....

थांब जराशी...


जाउ नकोस अशी सांज अजुन ढळली नाही
थांब जराशी..तुझ्या केसांत लाली अजुन माळली नाही

असा ना किंतु मनात साठवु जराही तु
प्रिये प्रित माझी अजुन मळली नाही

ठाउक मज बदनाम प्रेमात तुझ्या जरी
रित जगाची तरी कधी मी पाळली नाही

मी कधीचा गप्प... तुझ्या नयनांशीच बोलतो आहे
मौनाची भाषा माझी तुज अजुन कशी कळली नाही

मला टाकुन अशी जाउ नकोस आता
थांब जराशी तुही...वाट तुझी मी कधी टाळली नाही...

प्रेमात...


प्रेमात कधी रुसायचं असतं
प्रेमात कधी हसायचं असतं
दुस-याला ह्र्दयी बसवायचं असतं
पण प्रेमात कधी फ़सवायचं नसतं

प्रेम सहज होऊन जातं
निभावणं कधी कधी जिवावर येतं
दुस-यासाठी झुरावं लागतं
याच प्रेमात कधी कधी मरावंही लागतं

म्हणे प्रेम का करावं...दुस-यासाठी का झुरावं...
म्हणे प्रेम का करावं...दुस-यासाठी का झुरावं...
पण प्रेम केलं जात नसतं
मित्रांनो ...
प्रेम हे आपोआप होत असतं

तुझ्या वाढदिवशी...

असे सोनेरी क्षण
तुझ्यावर प्रत्येक क्षणी बरसावे...
प्रत्येक सुखाने
तुझ्याच घरी येण्या तरसावे...

तु घ्यावीस उंच भरारी
अन गाठावीस शिखरं...
साथीला दुनिया सारी
अन सारी तुझीच पाखरं...

फ़ुले दाटावी रस्त्यात तुझ्या
अन काट्यांचाही स्पर्श मखमली असावा...
तु चालता उन्हातुन
तळपणारा सुर्यही तुजसाठी सावली व्हावा...

व्हाव्यात पुर्ण तुझ्या सर्व इच्छा
तुझ्या वाढदिवशी याच तुज सदिच्छा...

ढग आठवांचा...

पाऊस असा कसा आज बरसुन गेला
अनामिक हूरहूर एक, मनात माझ्या रुजवुन गेला

कधि इवल्याशा छत्रिचा आडोसाही खुप होता
आज घरात माझ्याच, पाऊस मला भिजवुन गेला

अगणित थेंब याचे कधि मीच झेलले होते
आज का मग पाऊस हा, मज तरसुन गेला?

कातरवेळ आजची अशी सरींनी वेढुन आली
थेंब प्रत्येक,प्रत्येक सरीचा, मज खिजवुन गेला

ओढ ही कसली मनास माझ्या? ना कळे
ढग आठवांचा, मनात एक गरजुन गेला

मैत्रि


मैत्रि ....सांगुन होत नाही
मैत्रि...करायची ठरवली तरी करता येत नाही
मैत्रि ...मग होते तरी कशी?

मैत्रि होते अशीच नकळत...
कुणीतरी शब्दांनीच मनाच्या तारा छेडुन जातं
मनाशी मन जोडुन जातं
'मैत्रि'चं एक नवं नातं बनवुन जातं
अन 'दोघांनीही त्यास जपायचं' असं म्हणुन जातं...

'मैत्रि' म्हणा किंवा 'दोस्ती'
शब्द तसे लहानच आहेत...
पण आत दडलेले अर्थ
शोधता आले तर खुप महान आहेत....

मैत्रि कधि असते उनाड वा-यासाखी
सबंध आसमंत कवेत घेऊन उडणारी
अन कधि नाजुक फ़ुलासारखी
हवेच्या हलक्याश्या होक्यावरच डुलणारी

दु:खात हसु खुलवते ती मैत्रि
अन आपले अश्रु होऊन ढळते तीही मैत्रि
मैत्रि त्या निर्मळ सरितेसारखी
मैत्रि त्या धुंद श्रावणसरिंसारखी
अंधा-या रात्रि काजवा होऊन चमकते मैत्रि
कॄष्ण-सुदाम्याला पाहिल्यावर समजते मैत्रि

तु जप तुझी मैत्रि
मी जपतो माझी मैत्रि
सारचं फ़ोल यारा दुनियेत या
खरी फ़क्त तुझी माझी मैत्रि.......

मलाच जाळले मी...

जरी होऊन अश्रु तुझेच तराळले मी
तु बोल तुजसाठी मज नाही जाळले मी

रस्त्याने फ़ुलांच्याही मी जपुन चालणारी
मला न ठाऊक तुजवर का भाळले मी

उमजेल मी ...अन समजेल मीही जरा
म्हणुन कधी तुज सांगायचे टाळले मी

तुला माळण्याचा जरी खोटा प्रयास झाला
बघ.... आज तुझेच चंद्र तारे माळले मी

कधी न होती मला जरुर कंकणाची
नकळत तुझ्या नजरी मज न्याहाळले मी

मंद वारा अन धुंद तो श्रावण आजही
स्वप्नांच्या गावा मिठीत तुझ्या शहाळले मी

तुला न ठाऊक भवती ऊब ही कसली
तुजसाठी आज पुन्हा मलाच जाळले मी....

सजणी


अगे लाजवंती
नलाची जणू तु दमयंती
मनाशी माझिया तु खेळ का मांडियला?
अपराध सांग माझा असा काय झाला?

दिपक तु... मी पतंग वेडा
कैसे तुला हे न कळे
ठाउक आहे जरी जळणे
मी पतंग तुजसाठीच जळे

स्वर्गाची तु आहेस परि
नसेल मी चन्द्र जरी
संशय मजवर नकोस करु
प्रित माझी आहे खरी

रांगोळी अंगणाची
तुझ्याच प्रतिक्षेत आहे
तुळस दाराची सखे
तुझीच वाट पाहे

आता तरी प्रिये
गुलाबी ओठांची पंखुडी तु खोल
कर्ण जाहले अधीर
सजणाशी तु सजणी एकदाची बोल....

निवडुंग

मी असा त्या एका समईची वात होतो
जाळले मी मला...मी न कुणा ज्ञात होतो

हुंद्का हा कुणाचा श्रावणास आला?
मीच माझ्यासाठी त्या ग्रिष्मात गात होतो

तू माळ खुशाल नभातला चंद्र आता
मीच तुझा दिस कधि मीच तुझी रात होतो

करार तुझा मीच नामंजुर केला
जीवना..मीच तुज सोडुनि जात होतो

तू शोध सुगंधाची फुले दुसरी आता
निवडुंगाचा का कधि पारीजात होतो?

जीवन एक नाव

जीवन एक नाव... वल्हवे दोघं होऊ चलं
डगमगेल जरी...मिळुन पैलतिरी नेउ चलं

याच वाटेवर... खुपदा अनोळखी चाललो
घेउन हातात हात...एकमेकांचे आता होऊ चलं

झुकवु नकोस नजरा...त्याही बावरल्या आता
त्यांच्याच ओळखीने...नजरेस नजर देउ चलं

तसा प्रत्येकजण अनोळखी प्रत्येकाला
एकमेकांवर आपणच विश्वास थोडा ठेऊ चलं

चंद्र आणि क्षितिज... खुप दुर इथुन
इथचं कुठंतरी...घरटं छोटसं पाहु चलं

सांज आली ... सुर्यही बघ ढळाया लागला
ढळण्याआधी तो...प्रकाश त्याचा लेऊ चलं

क्षण एक एक संपतो...नकोस वेळ दवडु
आयुष्य आहे थोडं...पुरसं जगुन घेऊ चलं

ही काळरात्र नाही...बघ चांद नभी खुलला
होऊन एक दोघं...श्वास एकमेकां देउ चल

हुंदका..

हुंदका साधा तुझा सांगून गेला
सावरी जो तो सुद्धा पांगून गेला

तू पुन्हा ही राहिला प्यासाच येथे
जो नको तो आजही झिंगून गेला

हा वसंत असा कसा मोहरुन आला?
फ़ुलतसे जो...आज तो खंगून गेला

ज्यास सांगितले गुज सारे मनीचे
तोच फ़ासावर तुला टांगून गेला

काय तो आता पुन्हा सोडुन गेला?
तू पुन्हा एकटा अता दंगून गेला




सोडले दुनियेस सार्‍या आज का तू?
का शब्दात तुझ्या असा रंगून गेला?

ओठ ना जे बोलले दु:ख मनीचे
ते तुझ्या गझलेत तू सांगून गेला

एकदा पावसाला म्हटलं मी...


एकदा पावसाला म्हटलं मी...
" तु माझ्या घरी ये
आपण दोघं खुप खुप खेळु
पहिल्या पावसाचा गंध घेत दोघंही मातीत लोळु
तु माझ्यावर बरसुन घे खुप खुप
मला खुप भिजायचयं
तुझ्याशिवाय कोण माझं?
तुझ्याबरोबरच मला जगायचयं......"
पाउस म्हणाला....
" भिजण्यासाठी तुझ्या पापण्यांचा पूर तुला पुरेसा आहे
त्याच्यापुढे मित्रा मीच 'जरासा' आहे
आणी जगायचं म्हणत असशील तर...
मलाच माझा भरवसा नाही
मी ही तुझ्याचसारखा...
माझाही कुठला गाव असा नाही..."

प्रेम


प्रेमाला नसतात जातीनितीची बंधनं
प्रेमाला नसतात क्षितीजाच्या सीमा
प्रेम असतं रिमझिमत्या श्रावणसरिंसारखं
हिरवळीवर खुलणा-या हळुवार फ़ुलासारखं

प्रेम असतं दोन प्रेमळ मनांचा मिलाप
छेडला जातो ज्यातुन सप्तसुरांचा सुमधुर आलाप
प्रेमावर असतो फ़क्त प्रेमाचाच अधिकार
आणी असतो प्रेमळ मनांचा सहवास

प्रेम हे द्यायचं असतं
प्रेम हे घ्यायचंही असतं
जगातली अनमोलातली अनमोल गोष्ट प्रेम आहे
कारण...सर्वात स्वस्त प्रेम आणी प्रेमच आहे

श्रावणवेडा


अवचित आल्या अवनिवरती
जलधारा या होऊन मोती
फ़ुलं, पाखरं, झाडी नहाती
कधि साऊली कधि उन्हं नहाती

नभात कडकड विजा गरजल्या
सरसर मजवर सरी बरसल्या
ठाउक त्यांना मी श्रावणवेडा
भेटीस माझ्या त्याही तरसल्या

मीही जरा मग भिजुन घेतो
थंडीत थोडा थिजुन घेतो
लेऊन रंग मग इंद्रधनुचे
हर्ष नभी मी पेरुन येतो

भिजले डोंगर द-याही भिजल्या
पायवाटा त्या निपचीत निजल्या
सारेच मजला दिसे अतिसुंदर
श्रावणस्वागता जणु तरुणी सजल्या

पाणी खळाळुन वाहील आता
झुळझुळ गाणे गायील आता
मुक होती ही धरती कधिची
सप्तसुरांत ही न्हाईल आता

शांत जाहली दाह भुमिची
मंद जाहली आग रविची
मनात मझ्या आस पेटली
श्रावणवेड्या माझ्या प्रियेची...

मी तुझाच होतो...







सांज ढळली होती..रात नटली होती...
नभात चांदतारे..तेही मस्तीत सारे..
परी मी एकटाच होतो....
तरी मी तुझाच होतो

त्या वळणावरती
तु वाट वेगळी केली
सोडुन मज तु दुर दुर गेली
पाहीलेस ना वळुन मागे एकदाही
उभा मी त्याच वळणावर होतो...
अजुनही मी तुझाच होतो...

जगापासुन मी दुर झालो
एका काळोखात मी चुर झालो
हो! हो मी नशेत होतो...
परी ही नशा तुझीच होती..
अन मीही तुझाच होतो...

जगण्याचा शाप सोसु कसा?
रोज रोज मी मरु कसा?
अखेरच्या क्षणी माझ्याशीच रडुन घेतले मी...
मलाच जेव्हा मी सोडुन चाललो होतो..
तेव्हाही मी फ़क्त तुझाच होतो...

पाउस


उन्हात पाउस पडतो जेव्हा
शेतकरी राजा म्हणतो तेव्हा
चल रं सर्जा बिगी बिगी
बिगी बिगी चलं बिगी

हवेत येतो जेव्हा गारवा
हळुच बोले तेव्हा पारवा
फ़ुलेल धरती येइल वरती
रानोरानी नाद गर्जती

वर्षाराणी येई धावुनी
पाणीच पानी रानोरानी
मोर, पपीहा, चातक पक्षी
दिसे आनंदी गुलाब बक्षी

शेत असे ती काळी पाटी
पिकांची त्यावर हीरवी दाटी
शेते काळी ती हिरवी झाली
किमया अशी ही कोणी केली

पिके बहरती आनंदाने
पोपट गातो खुशीत गाणे
वर्षाराणीची ही किमया
स्वर्गच भासे दुसरा जणु हा

धान्याची मग आरास लागे
शेतकरी तव खुशीत सांगे
शेतकरी हा खरेच राजा
नसेल राजा कुणीच दुजा

नजर







कधि वा-यावरती उडणारी एक नजर
नजरेस मिळुन नजरेत जडणारी एक नजर

वाटते बघावे जरी उठवुन नजर
होऊन पाणी मनातच अडणारी एक नजर

शब्दांची जेव्हा हद्द संपते
समोरच्या नजरेत दडणारी एक नजर

कधि चंद्रावर कधि चांदण्यांत
सुर्याशीही कधि भिडणारी एक नजर

कधि भेटते ती क्षीतीजाला
कधि रस्त्यातच अर्ध्या सांडणारी एक नजर

तशी बोलकीच....पण कधि कधि
अश्रु होऊन रडणारी एक नजर

मिळते नजरेस नजर काहीच क्षण
तरी काळजात रुतुन तडफ़डणारी एक नजर

बदलु कसा मी तुझ्यासारखा?


तोच नभात चंद्रमा त्याचं नभात तारका
तुच तेवढी बदलली मी अजुन पहिल्यासारखा...

जरी वाटले तुज शब्द माझे अनोळखी
नीट बघ...चेहरा अजुन तोच तो बोलका

आता ना गंध मातीला पहिल्या पावसाचा
अजुनही तरी मी धुंद पावसासारखा

तुझिया स्वप्नांत नकोस घेऊ मला
विषय स्वप्नांचा माझ्या तुझाच पहिल्यासारखा

तु माळ खुशाल तो चंद्र केसांत आता
तुझ्या आठवणींचा क्षणही मला तुझ्याचसारखा

तुज ना आठवे तुझे रुप कधि जर
बघ नजरेत माझ्या... अजुन मी तुला आरशासारखा

जरी तु बदलली..दुर दुर गेली...
पुन्हा बदलु कसा मी तुझ्यासारखा?

तुजवीण ...

तुजवीण सुनी झाली कविता
अन शब्द पोरके झाले
शब्द होते श्वास माझे
मज श्वास परके झाले

तुजवीण शब्द सारे
सखये मलाच बोचती आता
कोण मी त्यांचा
जाब मलाच पुसती आता

तुजवीण सखये आता
मज लेखणीही दुर झाली
प्रत्येक कवितेची माझ्या
आता लय बेसुर झाली

तुजवीण सखये आता
कवितेत कुणास पाहु
बेनाम ही कविता माझी
सांग कुणास कशी देऊ

तुजवीण शब्द सखये
नुसतेच मज पाहुन गेले
जे होते साथ काही
ते अश्रुंत वाहुन गेले

तुजवीण कवित्व माझे
सखये सोडतो मी आता
कवितेतले नाव माझेच
सखये खोडतो मी आता

आठवणी


जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं

या आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण

आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण

माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या

ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले

आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात...

पावसा...

पावसा...
तुझ्याशी माझं नातं खुप जुनं आहे
तुझ्याबद्द्ल कितीही लिहीलं तरी उनं आहे
मी रडत असताना माझे अश्रु तु पिलास
कधि थेंब बनुन तर कधि शब्दांच्या रुपात
नेहमीच तु माझा साथ दिलास
वाटतं तुझा प्रत्येक थेंब घ्यावा झेलुन स्वत:च्या अंगावर
घ्यावं रडुन एकदाचं डोकं ठेवुन तुझ्या खांद्यावर
पण नाही....
मला तु परका नाहीस कधि
तसं इतरांनाही परका होऊ नकोस
दे त्यांनाही तुझं आयुष्य थोडं
असा तु स्वार्थी होऊ नकोस
तु फ़िर रानावनांतुन...नदि नाल्यांतुन
कुणालातरी तुझ्या ओलाव्याची गरज असेल
बघ कुठंतरी रानांना भेगा पडल्या असतील
एखादा चातक तुझ्यासाठी अखेरच्या घटका मोजत असेल
तुला दिसतील चिमुरडी पोरं रस्त्यावर धावताना
आपल्या आईलाही विसरुन तुझ्या शोधात फ़िरताना
बघं कुठंतरी एखादं हरिण तुझ्या आभासामागं धावुन
तडफ़डत असेल
बघ एखादं फ़ुल
तुला उमलायच्या आधिच कोमेजताना दिसेल
तुला सावली मिळणार नाही कुठं
झाडांची पानं कधिच गळाली असतील
माझ्या नजरेनं तुही बघं
कित्येक पक्षी तुझं जग सोडुन गेले असतील
हे सारं बघितल्यावर सरते शेवटी
रडु आलचं तुला तर तु ये माझ्याकडं...
रड आता तुही...माझ्या खांद्यावर डोकं ठेवुन
नाही...नाही...
सांत्वना नाही करणार तुझी
तेवढा मोठा मी नाही
पण हो...
मी रडेल तुझ्यासाठी
देइन माझे दोन अश्रु तुला..
तु आणखी बरसण्यासाठी..
तु खुप खुप बरसण्यासाठी...

भेटला असता प्रेमाचा एकतरी प्याला...

पक्ष्यांनी जशी किलबिल करावी
चांदण्यांची नितळ बरसात व्हावी
पानांनीही मग सळसळ करावं
तुझ्या स्वप्नांनी तसं नयनी भरावं

ओठांवरती पुन्हा हसु खुलावं
कळीनही मग उमलुन यावं
क्षितीजापलीकडुन तुझ्या हाकेने
आठवणींनी मनात बहरुन यावं

पावसाच्या सरि बघ पुन्हा कोसळल्या
तुझ्या भेटीस जणु त्याही उसळल्या
आठवणी तुझ्या मी मनात भरल्या
चांदण्यांतही ज्या खुलुन उरल्या

गुलमोहरही बघ बहरुन आला
श्रावण तर केव्हाच फ़ुलुनही गेला
भेटला असता प्रेमाचा एकतरी प्याला
नशिबाने आता तोही हिरावुन नेला

तुझ्याच वाटेकडं...


तु आता कधी परतुन येणार नाहीस
माझ्याशी कधी प्रेमानं हसणारही नाहीस
असलं जरी हे सत्य, ऐकत नाही मन वेडं
बसतं डोळे लावुन तुझ्याच वाटेकडं.

तुझ्या आवडीचा मोगरा तर आजही खुलतो
पण तुझ्या प्रतिक्षेनंतर त्याला पुन्हा सुकावचं लागतं
आणि तुझ्याच स्वागतासाठी बरसतातही जलधारा
पण त्यातही आता कधी भिजत नाही तुझी वाट
आता तर पेनातील शाई संपत आली
आणि कागदांचे थवेही एक एक करुन ऊडाले
तुझ्या प्रेमाचे ते चारच क्षण
पण स्व:तला कविता म्हणवुन कागदावर ऊतरले
माझ्या अंगणात तुझं प्रेमाचं पाऊल अलगद पडेल
मग तुझ्याकडं बघुन हसणारा मोगरा पुन्हा एकदा खुलेल
पुन्हा बरसतील त्याच जलधारा
वाहील पुन्हा तोच अवखळ वारा
पुन्हा तो श्रावण येईल...
ती सुनी मॆफ़ल पुन्हा एकदा गायील...
अशा आणि अशाच कितीतरी स्वप्नांनी दाटुन येते पहाट
पण.......
पण दुपारच्या ऊन्हात ही सगळी स्वप्न विरतात
आणि डोळे पुन्हा फ़िरतात...तुझ्याच वाटेकडं
वाळवंटी वाटेकडं.....
मॄगजळाकडं...

पुन्हा तुझ्या आठवणींची मॆफ़ल सुनी होईल.....


ढग दाटले नभी आता पुन्हा एकदा पाऊस येईल
शांत निजलेली तुझी आठवण पुन्हा जागी होईल

तु नसलीस तरी तो अजुन तसाच आहे
त्याच्याबरोबरच आज माझ्याही डोळ्यांत पाणी येईल

वीज कडाडली नभी क्षणभर अंधार झाला
मीठी माझी आता ऊगीचच घट्ट होईल

पावसाचा प्रत्येक थेंबही जणू तुझ्याचसाठी
तोही पुन्हा वाट चुकुन माझ्याचकडे येईल

पाऊस जरा मंदावला...दूरदूर गेला
आता पुन्हा तुझ्या आठवणींची मॆफ़ल सुनी होईल

शराब




दोन घोट दे तू शराब यारा
वाटे ही दूनिया खराब यारा

दु:ख तुझे नि माझे एकच येथे
तु ढाळ अश्रू मज दे शराब यारा

बेईमान ही माझीच जिंदगाणी
एक ईमान ही शराब यारा

का माझ्या शेवटाची ही सुरवात आहे ?
तु सोड चिंता अन घे शराब यारा

का कुणाची मी कधी वाट पाहू?
मी एकटा अन साथीला शराब यारा

पुन्हा सांज झाली.... पुन्हा रात आली....
पुन्हा भर एक जाम शराब यारा

मातीला गंध पावसाचा..

ढगाढगाच्या मागुन ढग नभात पळे
मातीमातीत गंध पावसाचा दरवळे

सरीसरीच्या मागुन सर झेपावली खाली
थेंब थंडगार ओले अंग अंग शहारले

चिऊचिमणी झाडाझाडांच्या वरती
धुंद होऊन गाती चिंब होऊन नहाती

भिती जराशी दाटली फ़ुलपाखरांच्या मनी
फ़ुलवित पिसारा निळा नाचे मोर रानोरानी

चंद्र रमला पुन्हा लपंडावाच्या खेळात
न्याहाळीतो रुपडे इंद्रधनुच्या रंगात

पायवाटा जुन्या झाल्या त्या गेल्या पाण्याखाली
मैत्रि पावलांची सरली क्षणभर दुरावली

थेंब होऊनिया मोती... सवे सजणाची प्रिती
सजणीच्या दारी येती...गीत सजणाचे गाती

सरींचं येणं, सरींचं जाणं हा खेळ दिवसाचा
ओसाड उजाड मातीलाही आज पुन्हा गंध पावसाचा...

अशीच यावी तु...


अशीच यावी तु...मनाने धुंदीत गान गावे
होऊन पाखरु त्याने जाऊन मग आकाशी भिडावे

अशीच यावी तु... मग सरिलाही विसर पडावा
तुझ्याच गालावर पडण्या तिचाही प्रत्येक थेंब चिंब व्हावा

अशीच यावी तु...कळीलाही जेव्हा गंध नसावा
होऊन फ़ुल तिने सुगंध तुझाच लपेटुन घ्यावा

अशीच यावी तु...मलाही जेव्हा ठाउक नसावे
स्वप्नांतुन बाहेर येता समोर पुन्हा तुच दिसावे

अशीच यावी तु...त्या चांदराती चंद्रालाही भुल पडावी
पाहुन तुज मिठीत माझ्या त्यालाही चांदणीची आठवण व्हावी

मैफ़ल एकट्याची सजली....


चंद्र नाही आज आकाशी
मन उदास उदास
चांदण्यांचा सडा जरी
रिते नभ भकास भकास

तळ्याच्या काठाशी
मी एकटा बसुन
रात सरुन गेली तरी
वाट पाहतो रुसुन

खुप लांबचा प्रवास
दव थकले, निजले
वेडे मन आतुरले
तुझ्या प्रितीत भिजले

दूर कुठं पहाट झाली
रात ढळाया लागली
नजर पुन्हा माझी
तुझ्याच वाटेकडे वळाया लागली

क्षणापुर्वीचे सोबती
पानं फ़ुलही निजली
मी एकटाच आता
मैफ़ल एकट्याची सजली....

प्रिय कविता...


प्रिय कविता,
जगापासुन दूर झालो
तेव्हा तुच मला कवेत घेतलसं
जग असतं फ़क्त दिल्या घेतल्याचं
हेही तुच मला शिकवलसं

तुच फ़क्त मन माझं जाणलसं
जगासमोरही तुच त्याला आणलसं
तु भेटली नसतीस तर भरकटलो असतो केव्हाच
शीड तुटलेल्या जहाजाप्रमाणे बुडालो असतो तेव्हाच

तु माझ्या श्वासावर
अन तुच माझ्या स्वप्नांत
स्वार्थाच्या या बाजारात
फ़क्त तुच माझ्या आपल्यांत

तुझ्याशी जीवनाची स्वप्नं सजवतो
तुटली तर येऊन तुझ्याशीच रडतो
कारण...
कारण...तुझ्याशी माझं नातं प्रेमाचं...
सु:ख दु:ख अन भाव-भावनांचं

तु येशील म्हणुन
नित्यक्षणी तुझी वाट पाहत आहे
मीही माझा नाही आता
'माझी कविता' म्हणुन तुझेच गुणगाण गात आहे...

ये पुन्हा अशी...
ये पुन्हा अशी की शब्दांची होवो बरसात
चल घेउन पुन्हा मला
चांदण्यांच्या तुझ्या अनोळखी स्पर्शात...
तुझाच प्रिय कवि,
--संदिप--