गीत माझे सूर तू छेड यारा

गीत माझे सूर तू छेड यारा
सूरात तुझ्या सूर माझा
शब्दांस माझ्या शब्द तू जोड यारा...

ही रात्र काजळी पुन्हा ढळून जाईल
तू हास आज
हासणे तुझे वाटे गोड यारा...

भरवसा उद्याचा सांग कुणी कुणास द्यावा?
तू घे जगुन आज
बंधने सारीच तोड यारा...

तू हो कवडसा सुखाचा तुझ्याचसाठी
दु:खे पडद्यामागे लपलेले
दूर त्यांना तू सोड यारा...

निघुन गेलो जरी कधि मी
राहील शब्दांच्या रुपाने सदा
नाते शब्दांशी माझ्या तू जोड यारा...

मन मनास उमगत नाही


मन मनास उमगत नाही
तगमग हि कुणास समजत नाही
हा शोध कुणाचा? कुठवर?
जो कधिच संपत नाही....

भेटले आजवर कुणी जरी
मृगजळ भासले सारेच
शोध पुन्हा तोच सुरु
जो कधिच संपत नाही....

बंदिस्त मनास माझ्या
तोडुन वाट शोधली
वाट ही पुन्हा त्याच शोधाची
जो कधिच संपत नाही

स्वप्नांत माझ्याच हरवते
नाही बघायची स्वप्न असंही ठरवते
पण अंधार दाटला नेहमीच
जो कधिच संपत नाही

पाऊलवाटा हळुवार होत्या
त्या कधिच दूर झाल्या
हा प्रवास अखंड आता
जो कधिच संपत नाही

तोच समुद्र पुन्हा

तोच समुद्र पुन्हा
अन पुन्हा तीच लाट
एकटाच मी या किनारी

सुनी सुनी तुझी वाट
या वाळुतलं घरटं
कधिच वाहून गेलं
तुझ्यासोबत सजवलेलं प्रत्येक स्वप्न
स्वप्नच राहुन गेलं
याच समुद्राची लाट
तुला खुप आवडायची
लाट आल्यावर मात्र
घाबरुन मला बिलगायची
गहि-या डोळ्यांत तुझ्या
समुद्र असाच साठला होता
जगलो त्यालाच पाहुन आजवर
अन किनारा त्याचा गाठला होता
पण......पण वाटल नव्ह्तं कधि
तोच समुद्र असा आटुन जाईल
धरुन आहे त्याचा जो किनारा
त्याच किना-याची अशी साथ सुटुन जाईल

वारा


वारा आला हा असा
गाणे तुझेच गायी
सुरेल हलकी झुळुक त्याची
तुच भासे मज ठायी ठायी
तुही अशीच होतीस कधि
याच वा-यासारखी
म्हणायचीस मला फ़ुल
अन तु फ़ुलपाखरासारखी
उनाड वारा आज हा
असा मज खिजवुन गेला
आठवणी तुझ्या दरवळल्या
आठवणींत ह्या मला भिजवुन गेला
आठवत तुला...याच वा-यासवे
आपणही कधि भनानलो होतो
घेऊन कवेत यास मुक्तपणे
नभि आपण विहारलो होतो
तू नसलीस जरी आज
तरी माझे या वा-यात येणे होते
रौद्र त्याच्या आवाजात
माझ्या हुंदक्याचेही मौन होते

पुन्हा तुला मी मैत्रिण म्हणुन मागेल

आता तुझं ते भेटणं नाही
दिलखुलास तुझं ते हसणं नाही

निरागस,नितळ वागणं तुझं मनात घर करुन गेलं
अन तुझं बोलणं कितीतरी आठवणी पेरुन गेलं

हसलो मी तुझ्यासोबत अन रडतानाही तुझाच साथ होता
जगलो मी खुप...हातात माझ्या तुझ्या मैत्रिचा हात होता

आठवतो तुला मी अधुन मधुन त्याचा राग नको मानुस
फ़क्त तुझ्या आठवणी आहेत..त्या तू परत नको मागुस

जगाला हसवत स्वत:चे अश्रू पिणारी तू
अळवावरच्या दवालाही तळहातावर घेणारी तू

तू माझं 'श्रद्धा'स्थान अन तुझी मैत्रि माझी 'श्रद्धा' होती
मी निवडुंग...पाहुन तुला...क्षणभर जगलो तू असं रानफ़ुल होती

आठवण तुझी आजही हळव्या मनास आहे...मग सांग मी कठोर कसा ठरलो
अगं...हे नखरे जीवनाचे, मैत्रित कधि मी न मागे सरलो

पुढच्या जन्मातही पुन्हा तुला मी मैत्रिण म्हणुन मागेल
हा जन्म अपुरा पडला पुढच्या जन्मी पुन्हा तुझा मित्र होऊन जगेल

पुन्हा आठवणी आल्या


आठवणींतच नेहमी
मला जगावसं वाटतं
सारं जग परकं इथं
आठवणींतच कुणीतरी माझं मला भेटतं

सा-या जगाचं परकेपण पाहुन
मन रडु लागतं
मनाला समजावण्यासाठी मग
आठवणींना आठवावसं वाटतं

आठवणींना विसरलो असतो
तर आजवर जगलो नसतो
आठवणींना आठवता यावं खुप
म्हणुन अजुन मला जगावसं वाटतं

पुन्हा आठवणी आल्या
मनात आठवणींची दाटी झाली
मनात दाटलेल्या आठवणींना
डोळ्यांत मला साठवावसं वाटतं