प्रेम तुझे

उतरले
हर एका
सरितून
प्रेम तुझे...
अंतरी या
भिजले गं
रुजले गं
प्रेम तुझे...

चांद येई
अंगणात
शिंपडीत
प्रेम तुझे...
वेडा खुळा
चिंब होई
लेवुनिया
प्रेम तुझे...

रातराणी
खुलताना
दरवळे
प्रेम तुझे...
पालटला
ऋतू कसा
गंधाळले
प्रेम तुझे...

खुल्या नभी
चांदणीला
खिजवते
प्रेम तुझे...
कोसळत्या
प्राजक्ताला
रिझवते
प्रेम तुझे...

अंधारता
दाहि दिशा
सावरते
प्रेम तुझे...
दिशाहीन
गलबता
साथ नेते
प्रेम तुझे...

क्षणोक्षणी
बहरते
लहरते
प्रेम तुझे...
काळजाला
झंकारते
गोंजारते
प्रेम तुझे...

काळजाचा
ठाव घेते
विसावण्या
गाव देते
तोकड्या या
शब्दात मी
मांडू कसे
प्रेम तुझे?

-शब्दसखा

चारोळ्या

पावसाशी ओल्या, गूज होते पुन्हा,
मनी आठवांची, रूज होते पुन्हा
वेल्हाळ पावसा, तुझ्या पैजणाचा नाद
पैजणाशी तुझ्या, कुजबूज होते पुन्हा

--शब्द्सखा!

तोही पाऊस आठवत असेल ना,
जेव्हा मी छत्री घरी विसरायचो
तुला आवडायचं म्हणुनच
मी मुद्दाम तुला फ़सवायचो.

--शब्द्सखा!

आठवत असेल ना तो पाऊस,
ओलेती तुला चिंब करुन गेला होता.
कसा एक थेंब हट्टी त्याचा
तुझ्या ओठांवर मोहरुन आला होता.

--शब्द्सखा

तो ही पाऊस आठवेल तुला
जेव्हा मन उगाच बावरलं होतं
अन भरकटलेल्या मनांना
मुद्दामच्या अंतरानं सावरलं होतं

--शब्द्सखा

तो पाऊसही आठवणीत असेल
जेव्हा भिजलेली मनं होती
स्व:तचीच खोटी समजूत म्हणुन
दोघांनीही उगाच चोरलेली तनं होती

--शब्द्सखा

पावसालाही तुला भेटायला आवडतं
म्हणूनच मी आल्यावर तो बरसत असतो
पण तू चिंब होतेस माझ्या मिठीमध्ये
अन मग तो एकटाच तरसत असतो

--शब्द्सखा

गालावरती ओघळलेला थेंब तुझ्या
मी अलगदपणे टिपला होता
अन तुझ्या ओठांमधला शहार
मी माझ्या ओठांमध्ये जपला होता

--शब्द्सखा

तुझ्या आवडीचा पाऊस
अताशा तसा बरसत नाही
तू दूर, मी दूर, म्हणूनच
अताशा तोही तरसत नाही

--शब्द्सखा

पावसाचे काही उनाड थेंब
तुझ्या केसांमध्ये दडले होते
पौर्णिमेच्या चांदण्यांसारखे
तेही तुझ्या रेशमात जडले होते

--शब्द्सखा

ओलेती तू, अन मी ही धुंद
पाऊस अशातच कोसळत होता
तुझ्या माझ्यासवे तोही
आपल्या श्वासांमध्ये मिसळत होता

--शब्द्सखा

अश्रुंना दाखवायची गरज नसते
समोरच्याला ते कळून येतात
समजून घेणारं असतं कुणीतरी
म्हणुनच ते डोळ्यांतून ढळून येतात

--शब्दसखा

प्रत्येक वेळेस शब्दांची गरज नसते
कधी कधी तु ही हे कळून घेत जा
न बोलता काही, पापण्या मिटून
या मिठीमध्ये विरघळून जात जा

--शब्द्सखा!

नकळतपणे येणार्‍या शब्दांनाही
कधी बोलायचं असतं
मनात दडलेल्या गुपीतांना
नकळतच खोलायचं असतं.

--शब्द्सखा!

शब्द रडतात, अन अश्रु वाहतात
अशाच वेळी कुणीतरी येतं..
न सांगताही कुणाला,
या अश्रुंना, कुणीतरी ओंजळ देऊन जातं.

--शब्दसखा

फ़ुलपाखरासारखी चंचल अन,
वार्‍यासारखी अल्लड वागतेस...
मी ही उधळतो मग प्रेम माझं,
जेव्हा तू निरागसपणे मागतेस...

--शब्दसखा!

सये,
तू सोबत असल्यावर
सगळं जग सोबत असतं
तुझ्याशिवाय मात्र
माझं मनही सुनं सुनं भासतं

--शब्दसखा!

सये, तू सोबत असल्यावर
आयुष्य आहे याची हमी पटते
तुझ्यासोबत जगायचं म्हणजे
आयुष्याची दोरी कितितरी कमी वाटते

--शब्द्सखा!

सये,
तू सोबत असल्यावर
माझं "मी" पण हरवून जातं
तूच उरतेस या मनभर
हे मनच तुझं होऊन राहतं

--शब्द्सखा

सये,
तू आहेस म्हणूनच
प्रत्येक क्षणाला अर्थ आहे
तुझ्याशिवाय जणूकाही
हा श्वासही व्यर्थ आहे

--शब्द्सखा!

सये,
तुझ्याशिवाय या शब्दांचं बरसणंही
अताशा तोकडं वाटू लागतं
डोळ्याच्या कडा ओलावतात आणि
मनात आठवणींचं आभाळ दाटू लागतं

--शब्दसखा

पाप

मना, किती हे व्याप रे...
क्षणाक्षणाला ताप रे!
कोण जाणे मागल्या जन्मी ,
काय घडले पाप रे !


...शब्द्सखा!

आज व्हलेन्टाइन्स डे...

आज व्हलेन्टाइन्स डे,
पुन्हा तुझ्या आठवणींना उजाळा,
पुन्हा आठवणींत भिजलेली दोन गुलाबाची फुलं,
जपून ठेवलेली तुझी ग्रीटिंग कार्ड्स
काही निवडक एसएमएस,
अजून बरच काही.
अन सोबतीला "तो" एक दिवस आठवणीनी लगडलेला,
अगदी मंतरलेला.
सगळं वातावरण उल्हासीत,
अगदी एखाद्या सणावारासारखं.
तसे नेहमीच भेटायचो आपण,
पण तो दिवस वेगळा होता,
फ़क्त प्रेमाचा होता.
अल्लड, हसरी तू...
त्या दिवशी अजुनच सुंदर दिसत होतीस.
केसातल्या फ़ुलालाही तुझ्या शोभा आलेली.
जणु, प्रेमाचे रंग चहुवार उधळलेले होते त्या दिवशी...

अजूनही आठवते,
त्या दिवसाची ती संध्याकाळ,
समुद्रकिनार्‍यावरची..
माझ्या खांद्यावर मान ठेवुन सगळं विसरलेली तू,
माझ्या कानात घुमत असलेला तुझाच आवाज,
तुझ्या डोळ्यांतून ओथंबणारं प्रेम.....
अन तू घट्ट धरलेला माझा हात,
कधिही न सोडण्यासाठी...

जर ठाऊक असतं की,
विरहात झुरावं लागेल दोघांनाही आयुष्यभर,
तर, प्रत्येक दिवस Valentine's Day म्हणुन सजवला असता मी...

आता, ना Valentine आहे, ना Valentine's Day...
पण हो,
तू दिलेलं ते गुलाबाचं फ़ुल अजून डायरीत आहे!
डायरीची पानंही गुलाबी झालीत आता तर...तुझ्यासारखी!

--शब्द्सखा!

तुच एकले उत्तर गं

तुझाच सखये गंध लेवुनी
रातराणी ही खुलते गं
नयनांचे या काजळ माळुन
रात अंबरी झुलते गं

पहाट्वारा दंगून जाई
मिठीत त्याचा दरवळ गं
चोरुन नेई कितीकितीदा
पुन्हा तुझा तो परिमळ गं

नाजूकसे तू फ़ूल गुलाबी
वार्‍यावर या झुलते गं
रुप तुझे तू विसरुन जाशी
वार्‍याला का भूलते गं

लाजून येशी समीप इतुकी
श्वासात तुझिया अत्तर गं
मना्स माझ्या प्रश्न केवढे
अन तुच एकले उत्तर गं


--शब्द्सखा!

कोई नही होता जब...

कोई नही होता जब,छुप छुप के हम रो लेते है
पुछ बैठे कोई सबब तो,युही कुछ कह देते है
...
कोई नही होता जब,छुप छुप के हम रो लेते है

दिल को हम बहला भी ले
दुनिया को हम समझा भी दे
रात की क्यों गर्द छाव में
खुदको ही हम खो देते है
...
कोई नही होता जब,छुप छुप के हम रो लेते है

पतझड मे कोई एक पत्ता
धुँआ हो जाए तो क्या
जख्मों को अपने ही हम
अश्क बहाकर सी लेते है
...
कोई नही होता जब,छुप छुप के हम रो लेते है

--शब्दसखा!

जबाबदारी

Yup..I am on the board now!
which board?
ohh..sorry forgot to tell you.

इकडे माझं बँक आँफ़ अमेरिकेत अकाँऊट आहे.
३-४ महिन्यांपुर्वीची गोष्ट. भारतात पैसे पाठवण्यासाठी, चेकिंग अकांऊट मधून रेमीटंस बूक केलं. अन जेवढी रक्कम रेमिट करायची होती ती आहे की नाही हे तपासून पाहील. All looked well.
Now another day. याच अकांऊंट मधून दुसर्‍या बँकेच्या माझ्याच अकांऊट्मध्ये ३०-४० डाँलर्स ट्रांसफ़र केले.
अन इथंच गोची झाली.

३०-४० डाँलर्स, जे इथेच एका बँकेत ट्रांसफ़र केले होते ते दुसर्‍याच दिवशी ट्रांसफ़र झाले.
२ ते ३ दिवसांनी भारतात पैसे ट्रांसफ़र(रेमीट) होण्याची प्रोसेस सुरु झाली.
And caught in trouble. "Insufficient Fund Transfer" message with red color.

भारतात पैसे ट्रांसफ़र करण्यासाठी जितक्या पैशांचं रेमीटंस बूक केलं होतं तितके अकाऊंट मध्ये नव्हतेच. कारण मी त्यातले ३०-४० डाँलर्स अगोदरच वापरले होते दुसरीकडे ट्रांसफ़र करण्यासाठी.
बँक आँफ़ अमेरिकेने मला Insufficient fund trasfer attempt म्हणून ३० डाँलर्सचा चुना लावला. अर्थात चूक माझीच होती. पण तरिही ३० डाँलर्स? It's huge amount guys. Almost 1500 Indian Rupees.
मनाशीच म्हटलं,च्यायला पुण्यात ११ हजारावर नोकरी करत असताना महिन्याच्या १५ तारखेलाच खर्चाचे वांधे व्हायला सुरुवात व्हायची अन इथं तब्बल १५०० रुपये असेच जाताहेत?

BOAच्या Online Representativeबरोबर बोलून कसंतरी त्याला ही फ़ी कँसल करायला लावली.Guess what, I got my 30$ back.

दुसर्‍या दिवशी आँफ़िसमध्ये चंद्राबरोबर बोलताना हा विषय निघाला(चंद्रा म्हणजे चंद्र नाही तर चंद्र्शेखर). And he made a statement which made me think, 'Welcome On Board'!.

चंद्रा,सतिश हे आँफिसमधले कलिग. त्यांच एक चतुर्थांश आयुष्य गेलं अमेरिकेत. आँल सेटल्ड. तिकडेही अन इकडेही.
सेटलमेंट बरोबर येते ती जबाबदारी. जबाबदारी आली की सुरुवात होते ती कर्तव्याची.
ही सेटलमेंट होताना अनेक वेगवेगळ्या प्रसंगांतून जावं लागतं. लहान मोठ्या अनेक गोष्टींची खबरदारी घ्यायला लागते. होणारं नुकसान, फायदा याचं गणित प्रत्येकवेळेस आपल्याला अपेक्षित असलेलंच उत्तर देईल असं नसतं. ह्या न त्या गोष्टींमागे भागमभाग सुरू होते. हवा तिथे हवा तेवढा वेळ देता येत नाही अन मनाविरुद्ध कुठे कुठे दिवसभर, महिनाभर, कधी कधी वर्षानुवर्षे तपश्चर्या करत बसावं लागतं.

आज मी कार घेतली. कार चांगली आहे(आजतरी). पण अंगावर अजून कितीतरी टेंशन्स ओढूनही घेतलीच.
कार जुनी आहे, काही प्राब्लेम देईल का? इन्शुरन्स घ्यायला लागेल. कुणाकडून घ्यायचा? लोन घ्यायला लागेल. कमी ईंटरेस्ट रेटने कुठे लोन मीळेल? लोनचा इएमआय देताना महिन्याचा बाकिचा खर्च अन सेव्हींग्सही झालीच पाहीजे.
हे सगळे प्रश्न म्हणजे कारबरोबर आलेले फ्री गिफ़्ट्स.
पुढे चालून काही दिवसांत(वर्षात) मी घर घेईल. पुन्हा फ्री गिफ्टस!

३-४ वर्ष झालेत तसे मला 'या' जगात येऊन. काँलेज संपलं अन 'या' जगाची सुरुवात झाली.
मी शाळा काँलेजात असताना, इतकी माहिती होती की वडील कामावर जातात अन पैसे कमावतात. परंतु thats not all.
आलेले पैसे कुठे अन किती खर्च करायचे हेही तितकचं महत्त्वाचं असतं हे कळायला आता सुरुवात झाली.
पुढील ३०-४० वर्षांचं रंगीबेरंगी स्वप्न डोळ्याच्या वाटांना खुणवायला लागलंयं. आता तिथपर्यंत पोचायचं म्हणजे हे सगळं अनिवार्यच.

Yes Chandra, finally I am on board too!!!

तुझ्यासाठी

ये माझ्या गं वसतीला
बस जरा सोबतीला
काळजाच्या आत खोल...सारे बोल..तुझ्यासाठी

तुझ्या मनात राहिल
जन्म आंदण वाहील
पापण्यांचे जरी घाव...माझी धाव..तुझ्यासाठी

माझ्या डोळ्यातली नीज
खुळी प्रेमातली भीज
हरएक श्वास माझा...ध्यास माझा..तुझ्यासाठी

अंधारता पायवाट
कधी काळोखात दाट
सोबतीला हात माझा..साथ माझा..तुझ्यासाठी


--शब्द्सखा!

तनहाई..

दुपहरें ऐसी लगती हैं, बिना मोहरों के खाली खाने रखे हैं,
ना कोई खेलने वाला है बाज़ी, और ना कोई चाल चलता है

- गुलजार(from movie Raincoat)


सडकों पें, गलियों मे,
घर घर कि दिवारों पे
कुछ बाकिसा निशाण छोड गया है
...
तनहाईयोंका कैसा ये मौसम था
यादों को जो जिंदा कर गया है...

बहारे थी अभी,
फ़ूल भी महके थे,
एक झोंका कोइ सुखासा कर गया है
...
तनहाईयोंका कैसा ये मौसम था
यादों को जो जिंदा कर गया है...

--शब्दसखा!


बारिश की बुंदे बेमौसम बरसती है
रुकी सी जिंदगी फ़िर से उलझती है
आजकल,
तनहाई हमारी गलियोंसे से गुजरती है...

--शब्दसखा!


...
फ़ुरसत मे गुफ़्तगू हमसे
तनहाई भी हमारी कहा करती है
पतझड की कैसी ये उम्र है
तनहाई ही इसमे तनहा रहा करती है

--शब्दसखा!

...
ऋत ये कैसी है तनहाई की
अश्क भी आपके सवरते होंगे
यादे बरसती होगी आजकल
जिनमे कभी हमारा बसेरा था..

--शब्द्सखा!

मला तुला साँरी म्हणायचं होतं

माझ्यावर तुझं निरागसपणे प्रेम करणं
अन तुझ्यावर माझं उगाचच वैतागणं
हर एक रुसल्या क्षणाला तुझ्या खुलवायचं होतं..
मला तुला साँरी म्हणायचं होतं...

मी गेलो तेव्हा पाऊस थांबला असेल
तुझ्या मनात वेदनांचा पूर दाटला असेल
गहिवरल्या तुझ्या त्या मनाचा किनारा व्हायचं होतं
मला तुला साँरी म्हणायचं होतं...

गर्दित असताना हुंदके टाळले असतील,
आठवणींत माझ्या तू टिपंही गाळली असतील
तुझ्या हुंदक्यांचा मला आधार व्हायचं होतं
मला तुला साँरी म्हणायचं होतं...

तुझी हासवं आठवतात,
तुझी आसवंही आठवतात
हासवांना जपत तुझ्या आसवांना टीपायचं होतं
मला तुला साँरी म्हणायचं होतं...

जाणतो मी..
आभाळभर मनात तुझ्या मीच उरलेलो,
तरिही पुन्हा मला ’माफ़ केलं..!’ असं ऐकायचं होतं
मला तुला साँरी म्हणायचं होतं...

--शब्दसखा!