कुठलेच दु:ख आता माझ्या घरात नाही
काहीच आज 'तसले' उरले उरात नाही
माळून चांदण्यांना तू दूर दूर गेली
हरवून चांद गेला तो अंबरात नाही
वाटा कधीच सार्या इथल्या गळून गेल्या
पाऊल थांबलेले आता भरात नाही?
मागू नको मला तू आता उधार काही
झालो फ़कीर तुजविण तू अंतरात नाही
मी जिंकलेच असते इवल्या दिशांस दाही
का ओढ या फ़ुलाची त्या भ्रमरात नाही?
घे तू..रडून घे तू मी थांबणार नाही
अद्याप पाहिली तू असली वरात नाही
--शब्द्सखा!
वरात
Labels: गझल
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 प्रतिसाद:
फारच सुंदर !
हं अरे संदीप, माजा ब्लॉग झुळुक. ऋतुरंग वर आधी दादाच्या कविता स्केन करयचा प्रयत्न केला पण तू सांगितलंच कि दिसता नाही. पण आता रोज एक अशी कविता टाकणार . एक टाकलीय आवडते आवाज. बघ.
मराठी एक् गोड भाषा...आणि त्यात ही सोन्यात सुगंधा सारखी, ही सुंदर कविता।...
Post a Comment