प्रेम म्हणजे विश्वास?
की प्रेम म्हणजे समर्पण?
राधा की मीरा?
प्रेम म्हणजे जगापासून दूर जाणं? अगदी स्व:तपासूनही?
प्रेमात जगणं, घडीघडीला प्रेम जगणं?
प्रेमात विलीन होऊन जाणं?
हुश्श्श्श.....एका मिनीटात कितीतरी छोट्या छोट्या प्रेमाच्या व्याख्या समोर आल्या नाही?
अर्थात या माझ्यासारख्या एखाद्या पामरानं मांडलेल्या साध्या शब्दांमधल्या प्रेमाबद्दलच्या व्याख्या.
एखादा विचारवतं असेल तर तो म्हणेल,
" प्रत्येक पावलानं दुसर्या पावलाला पावलागणिक साद घालत आदिपासून अनादीपर्यंत केलेला प्रवास म्हणजे प्रेम!"
प्रत्येकाच्या दृष्टीने प्रेम म्हणजे कदाचित काहीतरी वेगळच असेल.
पण अनुभुती एकच. Same feelings!
कुणी शब्दातून आपलं प्रेम व्यक्त करेल, कुणी संगीतातून, कुणी मनातच ठेवेल, तर कुणी फ़क्त नजरेनं.
ती गोष्ट माहित आहे ना भुंग्याची. संध्याकाळ होताना ते स्व:तला फ़ुलामध्येच हरवून घेतं प्रेमाची सीमा पार करुन. हेही प्रेमच.
कितीही नाही म्हटलं तरी आपापल्या परिनं, जसं जमेल तसं प्रत्येकजण प्रेम करेल हे मात्र चौकस!
मी? माझं प्रेम?
मीही असाच एक तुमच्यासारखा साधा, प्रेमाच्या साध्या व्याख्या करणारा प्रियकर.
प्रेम म्हणजे काय ते अद्याप उलगडलं नाही तितकसं. वरती जे काही म्हटलो ते असतं काहो प्रेम?
आता विचारावं तरी कुणाला? प्रत्येकाचं प्रेम वेगळंच.
माझंही तसचं.
माझंही प्रेम वेगळच.
अवखळपणे, वळणं घेत घेत वाहणार्या नदिसारखी ती.. तिला मी प्रेम म्हणतो.
अल्लड होऊन वार्यावरती दरवळणारा सुगंध ती ..तिला मी प्रेम म्हणतो.
आकाशाचं होऊन आकाशात भिरभिरणार्या निरागस पाखरासारखी ती..तिला मी प्रेम म्हणतो.
पावसाची सर कोसळताना मनात चलबिचल घडवून आणणारी आठवण ती..तिला मी प्रेम म्हणतो.
डोळे मिटताना स्वप्न बनून रात्रींना चमचमणारी ती..तिला मी प्रेम म्हणतो.
त्या फ़ुलपाखरामागं धावताना, त्या पाखरासंगं उंच उंच उडताना, त्या आठवणींत भिजताना माझं प्रेम असं खुलत जातं.
अन मग या सगळ्यांना सारखं सारखं प्रेम वाटताना माझं मात्र प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं.
हा दरवळ जपायचा आहे मला, तिचा अल्लडपणा, तिच्या आठवणी, ती स्वप्न सारं सारं जपायचं आहे मला. तिच्यासाठी घडीघडीला.
कदाचीत हेच प्रेम असेल.
तिचं हसू, तिचं असणं, तिचं भिरभिरणं, तिचं माझ्या मनावर अधिराज्य कदाचित हेच माझं प्रेम असेल.
हेच प्रेम जपायचं आहे मला.
तिला जपायचं आहे मला. माझ्यासाठी आयुष्यभर.
खरंच! प्रेम म्हणजे एक महोत्सव असतो आयुष्यभर चालणारा!
हा महोत्सव खुलवायचा आहे मला असाच प्रत्येक घडीला.
प्रेम म्हणजे एक महोत्सव!
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 प्रतिसाद:
खरंच! प्रेम म्हणजे एक महोत्सव असतो आयुष्यभर चालणारा!
अगदी खरयं.....खुप भावल्या तुझ्या भावना.....
Lucky Gal.. :)
"PREM TAR EK NASHAA AAHE"khup chaan bhavanaa...
अप्रतिम !!! खरंच आहे की प्रेम म्हणजे नक्की काय? हृदयात होणारी घालमेल, न्याहाळणारे डोळे, मनाच्या पटलावर तरंगणारे दृश्य, हवाहवासा वाटणारा सहवास, कि, ज्याच्या खांद्यावर रेलून वाटणारे समाधान, सांगत राहावे आणि त्याने त्याला प्रतिसाद द्यावा, छोट्या छोट्या गोष्टी पण लक्षात ठेऊन सरप्राइज देऊन किती बारीक लक्ष केंद्रित करणारं, सदैव काळजी घेणारं... हे हि काय तेच असतं ? खूपच सुंदर !!! 👌👌👍👍
Post a Comment