पेटलेल्या गुलमोहरालाही
उन्हाची झळ लागावी
उन्हानंही स्व:तला
स्व:तच कसंबसं सोसावं
रेडीओवर लागलेलं
’ए दील ए नादान...’ कानात घुमावं
लता मध्येच थांबल्यावर
गाणं अधिकच गहिरं वाटावं
वार्यावरती उडणार्या
एखाद्या वाळल्या पानाचं
फ़िरुन फ़िरुन पुन्हा
आपल्याच अंगणात येणं
सारे रस्ते पोरके
पेटलेले आभाळ
कोमेजलेली झाडं
रंग उडालेली फ़ुलं
वार्यानं हलणारं खिडकीच दार
अर्ध्या उघडल्या खिडकीतून
अंगावर येणारी उन्हाची एखादी तिरीप
सारं सारं भकास...
मनात रेंगाळणारी एखादी आठवण
अन खिडकीच्या गजांना धरुन शुन्यात हरवलेली नजर
--शब्द्सखा!
आठवण
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 प्रतिसाद:
खूप तरल लिहीलंस संदिप आवडले.. !!
अरे काय सुंदर लिहिले आहेस. बस्स! दिल खुष कर दिया बॉस.. थॅंक्स..बरेच दिवसानंतर मराठी कवितेला दाद द्यावीशी वाटली.. किप इट अप.
Post a Comment