बालपणाला मायेचं अंगण होतं

बागडायला नितळसं आभाळ
अन फ़ुलायला खुलं रान होतं...

घरीदारी आणिक अवतीभवती
प्रेमाचं एक हळवार गोंदण होतं
खरंच,
बालपणाला मायेचं अंगण होतं

आजीच्या मायेची ओढ होती
अन आजोबांकडे हट्ट असायचे...

अजाणत्याशा पाखराला असं
प्रेमाचं लाभलेलं आंदण होतं
खरंच,
बालपणाला मायेचं अंगण होतं

गोष्टींत रमायचो, मनमुराद बागडायचो
आईवर रागवायचो, कधी रुसायचो...

लहाणपणी कौतुकानं सार्‍यांवर
माझ्या हट्टांच असं बंधन होतं
खरंच,
बालपणाला मायेचं अंगण होतं

आईचे धपाटे, बाबांचं जपणं
भावंडांचं सांभाळण असायचं...

खेळताना धडपडल्यावर नेहमी
मित्रांचं अवतिभवती रिंगण होतं
खरंच,
बालपणाला मायेचं अंगण होतं

बालपणीच्या आठवांचे दीवे अताशा
रोज रात्री आकाशात लुकलुकतात
हरवल्या त्या क्षणांच्या भेटीगाठी
कधीकधी आठवणीत झगमगतात

--शब्द्सखा!

4 प्रतिसाद:

संजीव देशमुख said...
This comment has been removed by the author.
संजीव देशमुख said...

अप्रतिम कविता
विषय छान निवडलास. प्रत्येकाच्या मनातलं हे बालपण आयुष्यभर आठवणीत राहणारं.

कुठेतरी छानसे वाचलेले या कम्युनिटीवर ही कविता पोस्ट करा चांगला प्रतिसाद मिळेल
http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?rl=cpn&cmm=33294354

आशा जोगळेकर said...

फारच सुरेख. बालपण प्रत्येकाच्या मनांत असं वसलेलं असतं अन् अधून मधून आठवणींत झगमगतं.

*** Darshana *** said...

APRATIM KAVITA....LAHANPAN DE GA DEVA ...