तुच एकले उत्तर गं

तुझाच सखये गंध लेवुनी
रातराणी ही खुलते गं
नयनांचे या काजळ माळुन
रात अंबरी झुलते गं

पहाट्वारा दंगून जाई
मिठीत त्याचा दरवळ गं
चोरुन नेई कितीकितीदा
पुन्हा तुझा तो परिमळ गं

नाजूकसे तू फ़ूल गुलाबी
वार्‍यावर या झुलते गं
रुप तुझे तू विसरुन जाशी
वार्‍याला का भूलते गं

लाजून येशी समीप इतुकी
श्वासात तुझिया अत्तर गं
मना्स माझ्या प्रश्न केवढे
अन तुच एकले उत्तर गं


--शब्द्सखा!

1 प्रतिसाद:

Unknown said...

Hiiiiiiiiiiiiii
I can't imagine it's your writeups.
all are too......... good yaar.
No word to say anything.