अशी गं काय सारखी रागवत असतेस?

अशी गं काय सारखी रागवत असतेस?
माझ्यावरच्या प्रेमाला अशाही प्रकारे दाखवत असतेस...
तू रागवायचं...मी प्रेमाने तुझी समजुत घालायची...
खुप खुप प्रेम करायचं तुझ्यावर.....
कदाचीत यासाठी....
याचसाठी तू रागवत असतेस पुन्हा पुन्हा....हो ना?
ठाऊक आहे मला....
ठाऊक आहे मला....तू नसलीस बोलत तरी तुझे लटके डोळे सारं सारं सांगुन जातात
मी बघावं तुझ्याकडे प्रेमाने म्हणुन तुझ्याचसारखे तेही वेडे आस लावुन बसतात.
मी खुप खुप बोलत रहायचं......
एकट्यानेच....
तू नुसतंच ऐकायचं...
थोडा वेळ......फ़क्त थोडा वेळ गप्प राहायचं....
तसं तुलाही ठाऊक आणी मलाही तू बोलशील लवकरच माझ्याशी....
थोडा वेळ शांतता...
तसं मनाला तुझ्या वाटतच असतं बोलावं खुप खुप माझ्याशी...
अन काही वेळाने बोलायचं मग माझ्याशी...
अगदी लडीवाळपणे..अगदी नेहमीच्याचसारखं...
जणुकाही तुला राग आलाच नव्हता कधि माझा....
अगदी तसं वागायचं माझ्याशी.....
माझं होऊन जायचं पुन्हा नेहमी सारखं.....
सारं सारं विसरून....
जमलं कधि तर... माझ्या डोळ्यांत बघ तेव्हा डोकावुन... किती आनंद असतो दाटलेला......
पुन्हा चिंब चिंब न्हाऊन निघालेला असतो मी तुझ्या प्रेमात तेव्हा ....
पण खरं सांगू ?खुप बरं वाटतं तुझं रागावणही मला.
तुझा राग गेल्यावर वाटतं... जणु तू पुन्हा एकदा नव्याने भेटलीस मला.
असं वाटतं आता पुन्हा नवी भेट....पुन्हा नवी ओळख....
पुन्हा नवी स्वप्नं....पुन्हा नवी क्षितीजं..........दीप

0 प्रतिसाद: