तुझ्या मिठीत रात्र जाळण्याचा प्रश्न होता
पण रित या जगाची पाळण्याचा प्रश्न होता
शब्द न लेखणीला स्फ़ुरले का माझ्या तेव्हा
तुझेच नाव जेव्हा गाळण्याचा प्रश्न होता
खुलत गेलो होऊनी फ़ुल तुझ्याच रस्त्यावरती
पण ग्रिष्मात त्याला जाळण्याचा प्रश्न होता
तुझाच गाव येता पावले अडखळली अर्ध्यात
तुझीच वाट राणी टाळण्याचा प्रश्न होता
उगीच शोधतो मी आठवांना सांग तुझ्या का?
अता तुला गझलेत ढाळण्याचा प्रश्न होता
शब्द--संदीप सुरळे
प्रश्न
Labels: गझल
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिसाद:
Post a Comment