तू म्हणालीस...
आता आपण आपलं घर थाटूया
आपल्या दोघांच्या संसारात दोघंच नटुया
तशी नेहमीच सवय...
मला तुझ्या हो ला हो म्हणायची
तू सांगशील अगदी तसं वागायची
मन कावरं बावरं झालंही जरासं
आईवडिलांपासुन दूर जाताना
आजवर तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे जपलं
त्यांना वार्यावर सोडताना
आता जरी आलो आपल्या घरात..
इथं आपलेपणा नाही गं जाणवत..
इथं काही तुझं आहे अन काही माझं..
खरं खुरं प्रेम आत इथं नाही पाणवत...
अन काल तू म्हणालीस...
तुझ्या आईला बोलावुन घे...
"आया" परवडणार नाही
अन ह्याचं सारं करणं मला काही जमणार नाही...
--संदीप सुरळे
"आया"
Labels: सावर रे(आँर्कूट थ्रेडवरील)
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 प्रतिसाद:
ही आणि Standard ह्या दोन्ही कविता छान आहेत.
"आया" वरून खूप वर्षांपूर्वी ऐकलेल्या एका कवितेच्या ओळी आठवल्या -
उन उन खिचडी साजुक तूप,
वेगळं राह्यचं भारीच सुख
पूर्ण कविता आठवत नाही, पण साधारण आयामधे आहे तसाच असाच आशय होता..
Post a Comment