देव च्या कवितेला रिप्लाय देताना.............
---------------------------------------
तू दिली डायरी जी
अजुन कोरीच ठेवली मी
का म्हणुन नको विचारुस
कारण,कोर्या कागदांनाही अर्थ असतो...
कोरी डायरी माझी
अन कोरीच माझी कहाणी
वेड्या मनाला तरी वाटते का?
कोर्या कागदांनाही अर्थ असतो...
मी चित्र रंगवले होते आपले
पण पाऊस कोसळला असा
जणु जाणतो तोही हे की
कोर्या कागदांनाही अर्थ असतो...
सापडेल जेव्हा तुला डायरी माझी
नकोस ढाळु अश्रु एकही
राहु देत कोरेच कागद सगळे
तुही जाणशील..खरचं कोर्या कागदांनाही अर्थ असतो...
डायरी कोरी असली तरी
वाटेल तशा रेघा ओढु नकोस..
अगं वेडे..कोर्या कागदांनाही अर्थ असतो.
डायरीचं आयुष्य किती
ती कोरी आहे तोपर्यंतच, नंतर शब्दांची...
म्हणुनच..कोर्या कागदांनाही अर्थ असतो
शब्द बरसु लागतील
पानं हरवुन जातील सगळी...कविताच उरतील
काही वेळ फ़क्त..कोर्या कागदांनाही अर्थ असतो
--शब्दसखा!
कोर्या कागदांनाही अर्थ असतो
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 प्रतिसाद:
Post a Comment