" सगळंचं जग स्वार्थी "

" सगळंचं जग स्वार्थी " असं मी म्हणतो
अन सगळ्यांच्या जगामध्ये मीसुध्दा मोडतो

असतंच की जग स्वार्थी ,नाही कोण म्हणतं?
पण मग प्रत्येकजण " मी स्वार्थी नाही " असं का म्हणतं?

दाखवायचं रुप एक आणी मनात एक दडवायचं
असं दुहेरी वागणं का? का म्हणुन जगायचं?

स्वार्थी असावं प्रत्येकानं..नक्कीच असावं...
स्वार्थी असलं तरच काहीतरी साधता येईल...स्व:तचा अर्थ शोधता येईल

स्वार्थ नसतो कुणाकडे? त्या श्रीकृष्णाकडेही स्वार्थ होता
कौरवांच्या नाशासाठीच तर त्याने घडविला पार्थ होता

टीळक सुध्दा मला स्वार्थीच वाटले...
तेही स्वातंत्र्य "माझा" जन्मसिध्द हक्क असंच म्हटले...

होय मीही आहे स्वार्थी ...स्वार्थी होऊन जगणार...
सामान्य.... अगदी सामान्य माणुस समजुन स्व:तकडे बघणार....

सगळंचं जग स्वार्थी असं मी म्हणतो
अन सगळ्यांच्या जगामध्ये मीसुध्दा मोडतो

--संदीप सुरळे

0 प्रतिसाद: