थोडं दुखायला लागलं

मलाही आता थोडं दुखायला लागलं...
जगाकडं पाहुन कुठंतरी काहितरी खुपायला लागलं...
आई ऐवजी mom म्हणु लागलो...
फ़टाकड्या पोरींसाठी पैसे खर्चुन बाँम्ब बनु लागलो...
सिगारेटच्या धुरात स्व:तला हरवुन घेतोय...
गाईच्या ताज्या दुधाऐवजी पाश्चिमात्य पेयं पितोय...
सिनेमाला जाऊन धमाल होऊ लागली...
आधाराला खांदा मिळावा म्हणुन पोरगी हाताशी येऊ लागली...
माझं 'मी' पण कुठंतरी हरवलंय...
अन एक वेगळंच शहरी पिल्लु गवसलयं...
इथं नात्यांना जागा नाही...
प्रेमाचा हळुवार धागा नाही...
हे कसलं जगणं ?ज्याला कुठलचं भविष्य नाही....
हे फ़क्त वाहत जाणं... हे आयुष्य नाही...

पण हे सारं सारं आता क्षणिक वाटू लागलं....
सारं सारं अस्पष्ट होतं जाऊन...डोळ्यावर धुक दाटू लागलं..
आता आठवतो माझा गाव....गावाचा पार..
सकाळीच काढलेली गाईच्या ताज्या दुधाची धार...
आईनं बनवलेली भाकरी आठवते...
दोन पैशासाठी वडीलांनं केलेली चाकरी आठवते...
जीव गुदमरु लागतो...
घराच्या ओढीनं झुरु लागतो...
पण पुन्हा वडीलांच्या डोळ्यातलं स्वप्न दिसु लागतं...
अन क्षणभर वेडं झालेलं एक शहाणं पोर आता नियमीत अभ्यासाला बसु लागतं..

0 प्रतिसाद: