चारोळी-५

ऋतु क्षणात असा पालटुन गेला
ऐनवेळी आज कसा श्रावण आला?
ग्रिष्मातही मी वेडा, न्हाऊन निघालो चिंब
पाहुन डोळ्यांत तुझ्या, माझेच प्रतिबिंब

पाउस आल्यावर चंद्र
जरासा ढगाआड लपतो
तोही तुझ्याचसारखा..
स्वत:चं नाजुकपण जपतो

प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर शोधायचं नसतं
आणि उत्तर येत असुनही
कधिकधि अनुत्तरित व्हायचं असतं...

उद्याची वाट कशी पाहु?
मी तुला कसे समजावु?
उद्याचा भरवसा नाही सखे...
चल आजच जगुन घेऊ....

पुन्हा मेघ तो एक गरजुन गेला
पुन्हा श्रावण तो मज तरसुन गेला
मी राहीलो कोरडाच इथे
अन तो सा-या रानभर बरसुन गेला

मैत्री .... एक नाजूक धागा
हा दोघांनी जपायचा....
.एकानं तोडला तर
दुसर्‍यानं जोडायचा.....

दोन शब्द बोल मित्रा
इतर काही मागत नाही...
तुझी मैत्री असल्यावर
आयुष्य जगायला दुसरं काही लागत नाही...

आकाशातील तारासुध्दा
माझ्याशी आता परक्यासारखा वागतो...
मागणं माझं काहीच नसतं
तो मात्र रोजच तुटतो..

श्रावण....
येताना खुप पाउस घेऊन येतो
अन जाताना
पावसाइतक्या आठवणी देऊन जातो...

पावले चालत राहीली दुरवर
पाउलवाट मागेच अडखळुन पडली...
साथीला होते कोण कधि?
नाती सारी कधिच गळुन पडली...

सारेच जण इथं
एक कायदा चोखपणे बजावतात
जिवंत माणसाला जाळुन
मेल्यावर त्याचं प्रेत सजवतात

तु गप्प रहा अशीच
तुझ्या डोळ्यांनाच बोलु दे...
तुझ्या डोळ्यांची मुक भाषा
माझ्या डोळ्यांना कळु दे...

आता तो रस्ताही मूक झालाय
ज्यानं आपण चालायचो...
आज तु गप्प ...मीही गप्प...
कधि आपण त्या पानाफ़ुलांशी बोलायचो

माझ्या मनाशी होणारा संवाद ही
आता मी टाळतो
आजकाल माझ्याशीच
मी मुक होऊन वागतो

सांज ढळते
तुझ्या भेटेची आस अधिक छळते
ये निघुन प्रिये तु....
ठाऊक मज तुही माझ्याच आठवणींत जळते

पावसात भिजुन घेतो
मी पावसाशी हसुन घेतो
पावसातच अश्रु लपतात माझे
म्हणुन पावसाशीच मी रडून घेतो....

तु फ़क्त सोबत रहा मित्रा
हे आयुष्य असचं जगुन घेईल..
.मागितलंस कधि तर
सारं जगही जिंकुन तुला देईल...

सुर्य ढळला....आता चंद्र येईल
अन सबंध आसमंत त्याच्या मंद प्रकाशात न्हाऊन जाईल...
माझ्याही शब्दांना मग उधान येईल
आठवुन तुला...पुन्हा अशीच एखादी कविता जन्म घेईल...

कधि कधि माझचं लिहीणं
मला पटत नाही
शब्दांत मांडलेलं मनाचं कोडं
मग मलाच सुटत नाही

आयुष्यभर रडू नकोस
माझ्यापासुन दूर झाल्यावर
पण एक अश्रुतरी ढाळ
मला सोडुन चालल्यावर

चारोळी-६

तु समोर असलीस की
सारं जग परक होतं
एरवी आभळ पेलणारं मन
तेवढ्यापुरतं हलकं होतं

तु समोर असलीस की
पहिल्यापासुन जगावसं वाटतं
सारं जग तुझ्या नजरेनं
नव्यान बघावसं वाटतं

तु समोर असलीस की
मी मलाही परका होतो
तु फ़ुल अन मी
फ़ुलपाखरासारखा होतो

तु समोर असलीस की
वेळेचं भान उरत नाही
तुझ्यासोबतचा एक क्षण
युगं न युगं सरत नाही

तु समोर असलीस की
नुसतचं तुला पाहणं होतंअ
न तु गेल्यावर
शब्दांतुन तुला लिहीणं होतं

एक फ़ुलपाखरु
हलकेच हातावर येऊन बसलं
मला पाहुन तेही
तुझ्यासारखं खुदकन गालात हसलं

ए पावसा...
तु जा अन माझ्या प्रियेला भिजवुन ये
माझ्या वतीनं माझं प्रेम
तीच्या मनात रुजवुन ये

तु समोर असलीस की
डोळ्यांत तुझं साठणं होतं
मग तु नसताना
डोळे बंद करुन स्वप्नांत तुला भेटणं होतं

तुला बघुन
फ़ुल उमलुन येत
तेही जणु तुझचं
नाजुकपण घेत

मरण्याआधी माझी चिता
मलाच सजवायची आहे
आयुष्यातली शेवटची कामगिरीसुध्दा
मलाच बजवायची आहे

तु समोर असलीस माझ्या
की श्रावणही तरसु लागतो
विसरुन नियम त्याचे
तो ग्रिष्मातही बरसु लागतो

तु समोर असलीस की वाटतं
माझं सगळं तुला द्यावं
बदल्यात तुझ एक
फ़क्त एक हसु घ्यावं..

आठवतं तुला...
आपण दोघं पावसात भिजायचो
गारठुन गेल्यावर मात्र
एकमेकांच्या मिठित थिजायचो...

असंच एखाद्या दुपारी
आठवणींच आभाळ मनात दाटु लागतं
ग्रिष्मातलं उनही मग
श्रावणातलं वाटु लागतं

पुन्हा सांज आली
याद तुझी पुन्हा झाली
तुजवीन प्रिये...
जिंदगी माझी मलाच पोरकी झाली

तुझ्या गावची
रितच आगळी आहे
येथे कुणी न माझे
तुही वेगळी आहे

तुझी वाटेतली भेटही
आता मी मुद्दाम टाळतो
तु गेल्यावर माझं काय?
या विचारानं आजकाल मी मलाच जाळतो

पुन्हा आली ही कातरवेळ
मनात एक हूरहूर दाटवण्यासाठी
जुन्या आठवणींतली अशीच एक
आठवण आठवण्यासाठी

खुप खुप कोसळतो जरी
पाऊस आपल्या दोघांनाही हवा आहे
तुझं प्रेम मला नी माझं प्रेम तुला देतो
आपल्या प्रेमाचा हा दुवा आहे

ही हवा गुलाबी
जणु तुज स्पर्शुन आली
होतो मी कोरडा कधिचा
मज ती भिजवुन गेली

चारोळी-७

पावसालाही
तुझ्या पावलांची चाहुल
तुझं मला भेटायला येण्याच्या आत
त्याचं माझ्या दारात पाऊल

पावसाला सांगतो मी
माझ्या घरी तु येऊ नकोस
वाळवंटी जीवनाला
श्रावणाची जुनी आठवण तु देऊ नकोस

पाऊस आणि आठवणी
एकमेकांशी मैत्रि करतात
तसे दोघेही माझेच
पण मग मात्र माझे शत्रु बनतात

झाडाचं तुटलेलं एक पान
दुर दुर ऊडत होतं
झाडापासुन दुर झालं म्हणुन
ते खुप खुप रडत होतं...

कातरवेळ आली की
तुझ्या आठवणींचं छळण होतं
मग माझ्या मनाचं रडणं
आणी अश्रुंचं पापण्यांआड दडणं होतं

आठवणींच्या मैफ़लीत माझ्या
असचं तुझं येणं होतं
मुक शब्दांचंही माझ्या
मग सप्तसुरेल गाणं होतं

दिव्याखाली अंधार असतो
पण हे त्याला कळत नाही
स्व:त अंधारात असला तरी
स्व:तसाठी तो कधिच जळत नाही...

तुझ्याशिवाय जगणं
आता जिवावर आलयं
तुझ्या आठवणी रोज मारतात
मरण मात्र दुर झालयं

दोन पावलं चालायचं असेल फ़क्त
तर आत्ताच माझा हात सोड
आयुष्यभर नसेल टीकणार
तर मनावरुन माझं नाव कायमचं खोड

प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब
तुझी आठवण सजवुन जातो
बदल्यात मात्र स्वत:ला...
माझ्या अश्रुंत भिजवुन घेतो

खाली पडायच्या आधी क्षणभर
दव पानावर थिजुन घेत...
वेडं पान मग
पाउस समजुन दवातच भिजुन घेतं

तु गेल्यावर
मी खुप खुप रडुन घेतलं
बहरुन आलेल्या झाडानं
ऐन श्रावणात झडुन घेतलं

तु म्हणालीस म्हणुन...
आयुष्यात तुला कधिच नाही आठवणार
पण तुझ्यानंतर पोरक्या झालेल्या या मनास
कुणाकडचं नाही पाठवणारं

रात्र सरायला लागली की
पहाटेची स्वप्न फ़ुलतात
माझ्या आयुष्याच्या सा-याच वाटा
तुझ्या नयनी येऊन संपतात

तुझ्यासाठी
मी रात्रभर जागत असतो
एखादा तारा तुटताना दिसेल
म्हणुन एकटक आकाशाकडं बघत बसतो

वा-याची मंद झुळुक
पावसाची धुंद लहर
जीवनाच्या वाटेवर कधिकधि
असाच तुझ्या आठवणींनाही बहर

आयुष्य...
दिसताना एक भकास पडलेलं रान
पण पाहता आलं तर
वाळलेलं पण जाळीदार पान

समुद्राच्या दोन्ही किना-यांना
मला एकत्र आणायचंयं
त्यासाठी समुद्राच्या मध्यावर उभं राहुन
दोन्ही किना-यांकडं एकदाच बघायचयं

समजावलं खुप त्याला मी
त्याच्या मार्गातला फ़ुल बनलो अन काटाही कधि
पण त्याचं आपलं वेगळचं
जीवन म्हणे माझं सारं काही निराळचं

समुद्राला मिळाली की
नदी स्वत:चं अस्तित्व विसरते
हे तिला ठाऊक असुनही
ती जाऊन समुद्रात मिसळते

चारोळी-८

तुला आठवणं म्हणजे
तुला पाहणं आहे
क्षणभर का होईना
पण भुतकाळात जाऊन तुझ्यासोबत राहणं आहे

गुलमोहराचं वागणंही
आठवणींसारखचं असतं
सा-या जगात उन्हाळा पेटतो
अन मग हा एकटाच फ़ुलांनी दाटतो

प्रत्येक संध्याकाळी
तुझ्या आठवणींची मैफ़ल भरते...
ही मैफ़लच नंतर
एक गोड आठवण बनुन सजते

पावसाचं अन माझं
आजकाल पटत नाही
तो आला तरी त्याच्यासोबत खेळायला
मला माझं घर सुटत नाही

रोज पडणारा पाऊसदेखील
मला रोजच नविन वाटतो
प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब
मनात एक आठवण बनुन साठतो

पावसालाही
तुझ्या पावलांची चाहुल
तुझं मला भेटायला येण्याच्या आत
त्याचं माझ्या दारात पाऊल

पावसाला सांगतो मी
माझ्या घरी तु येऊ नकोस
वाळवंटी जीवनाला
श्रावणाची जुनी आठवण तु देऊ नकोस

पाऊस आणि आठवणी
एकमेकांशी मैत्रि करतात
तसे दोघेही माझेच
पण मग मात्र माझे शत्रु बनतात

झाडाचं तुटलेलं एक पान
दुर दुर ऊडत होतं
झाडापासुन दुर झालं म्हणुन
ते खुप खुप रडत होतं...

कातरवेळ आली की
तुझ्या आठवणींचं छळण होतं
मग माझ्या मनाचं रडणं
आणी अश्रुंचं पापण्यांआड दडणं होतं

आठवणींच्या मैफ़लीत माझ्या
असचं तुझं येणं होतं
मुक शब्दांचंही माझ्या
मग सप्तसुरेल गाणं होतं

दिव्याखाली अंधार असतो
पण हे त्याला कळत नाही
स्व:त अंधारात असला तरी
स्व:तसाठी तो कधिच जळत नाही...

तुझ्याशिवाय जगणं
आता जिवावर आलयं
तुझ्या आठवणी रोज मारतात
मरण मात्र दुर झालयं

दोन पावलं चालायचं असेल फ़क्त
तर आत्ताच माझा हात सोड
आयुष्यभर नसेल टीकणार
तर मनावरुन माझं नाव कायमचं खोड

प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब
तुझी आठवण सजवुन जातो
बदल्यात मात्र स्वत:ला ...
माझ्या अश्रुंत भिजवुन घेतो

पावलोपावली
तुझी साथ आहे
दूर असलीस तरी
क्षणोक्षणी तुझाच भास आहे

तुझ्याकडं पाहताना
मनातलं बोलायचं राहुन गेलं
श्रावणाची वाट पाहताना
आभाळ कधिच वाहुन गेलं

तुझं सगळं तु मला दिलं
तुझं असं काही उरलं नाही
नशीब माझंचं फ़ाटकं
तुझं सगळंही मला पुरलं नाही

तुझ्याच केसांचि एक बटही
आपल्या प्रेमास नडली
तुझ्याकडं पाहताच येऊन
तुझ्या गालावर पडली

तुझ्या घरासमोरील गुलमोहरही
माझ्यासारखाच वेडा आहे
पावसाळा कधिच सरून गेला
तरी अजुन त्याला आकाशाचा ओढा आहे

चारोळी-९

शब्द माझे असतात उनाड वा-यासारखे
अन कधि रिमझिमत्या श्रावणसरिसारखे
दोन क्षण घेतो विसावा कुणी कधि येथे...
मग होतात शब्द माझे खळखळणा-या झ-यासारखे...

शब्दांना जुळायला वेळ लागत नाही
शब्दांना कळायला वेळ लागतो
शब्दांशी खेळताना
मनाशी भावनांचा खराखुरा मेळ लागतो

शब्दांशी शब्द जुळतीलच असं नाही
शब्दांनी शब्द पेटतीलच असंही नाही
तरीही शब्दांना बांधावच लागतं
भावनांचा खेळ खेळताना शब्दांच्या कुशीत शिरावचं लागतं

शब्दांशी मैत्रि असावी
म्हणजे हवं तसं जगता येतं
जग रडत असलं बाहेर
तरी एकट्याला हसता येतं...

तुझी मैत्रि आहे म्हणुन
या मृगजळासही अस्तित्वाचा भास
एरवी मात्र.......एका अनोळखी वाटेने
नुसता अखंड प्रवास

असं वाटतं आता शब्दांचीही साथ सुटेल
आणी मी पुरता एकटा होईल....
'आता कुणासाठी जगतोयसं?' असं म्हणत...
आयुष्य क्षणोक्षणी चटका देईल...

आयुष्यभर चातक बनुन
मी पावसाची वाट पाहीली
पण...या वाळवंटात मात्र
फ़क्त माझीच पापणी वाहीली...

अशा धुंद श्रावणात बेधुंद रात येते
छेडीत सप्तसुर थंडी गुलाबी गीत गाते
शरीरे दोन जरी...सूर त्यातुन एकच उमटे
मी गंध तुझा...तु रातराणी... मज सोडुन का जाते?

तु समोर असलीस की
सा-या जगात मी
अन तु गेल्यावर मात्र
शोधात माझ्याच मी

सांज ढळली...तारा तुटला...
मनात आशेचा एक अंकुर फ़ुटला...
समजावले मनास मीच
अरे वेडया...जगणे त्यास असह्य झाले
म्हणुन तोही निखळत सुटला...

एकदा तुला म्हटलं होतं
आयुष्यभर तुझी साथ देईल...
मला कुठं ठाऊक होतं तेव्हां
आयुष्यचं माझी साथ सोडुन जाईल

जखम झाली तरी
तीला मी वाहु देत नाही
माझी जखम मी
जगाला पाहु देत नाही

तुझ्या राज्यात मला
थोडीशी जागा दे
राजा म्हणुन नको
पण....प्रजा म्हणुन तरी मला तुझ्या राज्यात घे

कुणाला भेट म्हणुन काही दिलं की
त्याच्यावर मी माझं नावं टाकत नाही
कुणीतरी मला 'ऊगीचच' आठवावं
असं मी मुळीच वागत नाही

जुळले काही शब्द
पुन्हा चार ओळी झाल्या
नसलीस तु जरी
आठवणी तुझ्या तुलाच घेऊन आल्या...

तु फ़क्त सोबत रहा मित्रा
हे आयुष्य असचं जगुन घेईल...
मागितलंस कधि तर
सारं जगही जिंकुन तुला देईल...

सुर्य ढळला....आता चंद्र येईल
अन सबंध आसमंत त्याच्या मंद प्रकाशात न्हाऊन जाईल...
माझ्याही शब्दांना मग उधान येईल
आठवुन तुला...अशीच एखादी कविता पुन्हा जन्म घेईल...

उद्याची वाट कशी पाहु?
मी तुला कसे समजावु?
उद्याचा भरवसा नाही सखे...
चल आजच जगुन घेऊ....

आभाळास पेलुन घेइल
मी वादळास झेलुन घेइल
तु फ़क्त साथ रहा..
क्षणभर मृत्युशीही खेळुन घेइल..

अशी वरवरची हाक नकोय
मनापासुन मला साद घाल...
अवघं आयुष्य तुला देईल
एकदा माझ्या भावनांना हात घाल

माझे जेव्हा सरण पेटले होते...

मज भेटले ते सारे श्रावण कोरडे होते
अन पाहिले मी जे ते स्वप्न भंगले होते

अपराध ना आठवतो मज होता काय घडला
गेलो जिथे मी त्यांनी काटे पेरले होते

नशिब फ़ुटके भेट तुझी न माझी उशिराच झाली
तुज भेटलो मी जेव्हा मज मरण भेटले होते

मज पाहण्या जळताना गाव असा लोटला होता
त्यांना उब दिली माझे जेव्हा सरण पेटले होते

तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...पण...हातात माझ्या हक्काच असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...म्हणुनच वाटतं...
तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलोच तुझ्यासोबत तरी माझे शब्द असतील
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच देऊ शकतो तुला खात्री...

रिमझिम पाउस आला गं सखे

रिमझिम पाउस आला गं सखे
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे

तु अन मी...
अन पाउस हा
गारा पुन्हा त्याच्या चल झेलु गं सखे
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे .....

हवा गुलाबी मस्तीत आली...
विसरुन भान आपणही
बेभान पुन्हा होवु गं सखे...
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे

चंद्र ढगाआड दडला
इंद्रधनु सप्तरंगांनी खुलला
रंग त्याचे आपणही चल लेऊ गं सखे
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे

पोरका हा श्रावण
भेटण्या धरतीस आला
प्रेम आपलेही थोडे चल त्याला देऊ गं सखे
श्रावण पुन्हा तुझा झाला गं सखे

माझी दु:खे


माझ्या दु:खांचा मला बाजार मांडायला नाही आवडत
माझ्याच दु:खांशी मला भांडायला नाहि आवडत

साथ माझीच मला देऊन रडून घेतो मी
जगासमोर एक अश्रुही मला सांडायला नाहि आवडत

ठाऊक आहे फ़क्त दु:खेच माझी साथ माझ्या
कुणा आपल्यांच्या शोधात मला हिंडायला नाही आवडत

अजुन जगायला हवं


अजुन जगायला हवं
जग अजुन बघायला हवं
सोसलं नाही अजुन जास्त...
एवढ्यात मरण नको...
अजुन मला सोसायला हवं

कुणीच नसलं जरी
बाजार दु:खांचा मांडलाच आहे
दु:खे माझीच सारी
दु:खांना या मलाच पोसायला हवं

आपल्याच एका क्षणावर
आपल्याच एका श्वासाचा अधिकार
इथं कोण कुणाचा असतो?
मी सांग कुणाला कोसायला हवं?