चारोळी-५

ऋतु क्षणात असा पालटुन गेला
ऐनवेळी आज कसा श्रावण आला?
ग्रिष्मातही मी वेडा, न्हाऊन निघालो चिंब
पाहुन डोळ्यांत तुझ्या, माझेच प्रतिबिंब

पाउस आल्यावर चंद्र
जरासा ढगाआड लपतो
तोही तुझ्याचसारखा..
स्वत:चं नाजुकपण जपतो

प्रत्येक प्रश्नाचं
उत्तर शोधायचं नसतं
आणि उत्तर येत असुनही
कधिकधि अनुत्तरित व्हायचं असतं...

उद्याची वाट कशी पाहु?
मी तुला कसे समजावु?
उद्याचा भरवसा नाही सखे...
चल आजच जगुन घेऊ....

पुन्हा मेघ तो एक गरजुन गेला
पुन्हा श्रावण तो मज तरसुन गेला
मी राहीलो कोरडाच इथे
अन तो सा-या रानभर बरसुन गेला

मैत्री .... एक नाजूक धागा
हा दोघांनी जपायचा....
.एकानं तोडला तर
दुसर्‍यानं जोडायचा.....

दोन शब्द बोल मित्रा
इतर काही मागत नाही...
तुझी मैत्री असल्यावर
आयुष्य जगायला दुसरं काही लागत नाही...

आकाशातील तारासुध्दा
माझ्याशी आता परक्यासारखा वागतो...
मागणं माझं काहीच नसतं
तो मात्र रोजच तुटतो..

श्रावण....
येताना खुप पाउस घेऊन येतो
अन जाताना
पावसाइतक्या आठवणी देऊन जातो...

पावले चालत राहीली दुरवर
पाउलवाट मागेच अडखळुन पडली...
साथीला होते कोण कधि?
नाती सारी कधिच गळुन पडली...

सारेच जण इथं
एक कायदा चोखपणे बजावतात
जिवंत माणसाला जाळुन
मेल्यावर त्याचं प्रेत सजवतात

तु गप्प रहा अशीच
तुझ्या डोळ्यांनाच बोलु दे...
तुझ्या डोळ्यांची मुक भाषा
माझ्या डोळ्यांना कळु दे...

आता तो रस्ताही मूक झालाय
ज्यानं आपण चालायचो...
आज तु गप्प ...मीही गप्प...
कधि आपण त्या पानाफ़ुलांशी बोलायचो

माझ्या मनाशी होणारा संवाद ही
आता मी टाळतो
आजकाल माझ्याशीच
मी मुक होऊन वागतो

सांज ढळते
तुझ्या भेटेची आस अधिक छळते
ये निघुन प्रिये तु....
ठाऊक मज तुही माझ्याच आठवणींत जळते

पावसात भिजुन घेतो
मी पावसाशी हसुन घेतो
पावसातच अश्रु लपतात माझे
म्हणुन पावसाशीच मी रडून घेतो....

तु फ़क्त सोबत रहा मित्रा
हे आयुष्य असचं जगुन घेईल..
.मागितलंस कधि तर
सारं जगही जिंकुन तुला देईल...

सुर्य ढळला....आता चंद्र येईल
अन सबंध आसमंत त्याच्या मंद प्रकाशात न्हाऊन जाईल...
माझ्याही शब्दांना मग उधान येईल
आठवुन तुला...पुन्हा अशीच एखादी कविता जन्म घेईल...

कधि कधि माझचं लिहीणं
मला पटत नाही
शब्दांत मांडलेलं मनाचं कोडं
मग मलाच सुटत नाही

आयुष्यभर रडू नकोस
माझ्यापासुन दूर झाल्यावर
पण एक अश्रुतरी ढाळ
मला सोडुन चालल्यावर

0 प्रतिसाद: