चारोळी-७

पावसालाही
तुझ्या पावलांची चाहुल
तुझं मला भेटायला येण्याच्या आत
त्याचं माझ्या दारात पाऊल

पावसाला सांगतो मी
माझ्या घरी तु येऊ नकोस
वाळवंटी जीवनाला
श्रावणाची जुनी आठवण तु देऊ नकोस

पाऊस आणि आठवणी
एकमेकांशी मैत्रि करतात
तसे दोघेही माझेच
पण मग मात्र माझे शत्रु बनतात

झाडाचं तुटलेलं एक पान
दुर दुर ऊडत होतं
झाडापासुन दुर झालं म्हणुन
ते खुप खुप रडत होतं...

कातरवेळ आली की
तुझ्या आठवणींचं छळण होतं
मग माझ्या मनाचं रडणं
आणी अश्रुंचं पापण्यांआड दडणं होतं

आठवणींच्या मैफ़लीत माझ्या
असचं तुझं येणं होतं
मुक शब्दांचंही माझ्या
मग सप्तसुरेल गाणं होतं

दिव्याखाली अंधार असतो
पण हे त्याला कळत नाही
स्व:त अंधारात असला तरी
स्व:तसाठी तो कधिच जळत नाही...

तुझ्याशिवाय जगणं
आता जिवावर आलयं
तुझ्या आठवणी रोज मारतात
मरण मात्र दुर झालयं

दोन पावलं चालायचं असेल फ़क्त
तर आत्ताच माझा हात सोड
आयुष्यभर नसेल टीकणार
तर मनावरुन माझं नाव कायमचं खोड

प्रत्येक पावसाचा प्रत्येक थेंब
तुझी आठवण सजवुन जातो
बदल्यात मात्र स्वत:ला...
माझ्या अश्रुंत भिजवुन घेतो

खाली पडायच्या आधी क्षणभर
दव पानावर थिजुन घेत...
वेडं पान मग
पाउस समजुन दवातच भिजुन घेतं

तु गेल्यावर
मी खुप खुप रडुन घेतलं
बहरुन आलेल्या झाडानं
ऐन श्रावणात झडुन घेतलं

तु म्हणालीस म्हणुन...
आयुष्यात तुला कधिच नाही आठवणार
पण तुझ्यानंतर पोरक्या झालेल्या या मनास
कुणाकडचं नाही पाठवणारं

रात्र सरायला लागली की
पहाटेची स्वप्न फ़ुलतात
माझ्या आयुष्याच्या सा-याच वाटा
तुझ्या नयनी येऊन संपतात

तुझ्यासाठी
मी रात्रभर जागत असतो
एखादा तारा तुटताना दिसेल
म्हणुन एकटक आकाशाकडं बघत बसतो

वा-याची मंद झुळुक
पावसाची धुंद लहर
जीवनाच्या वाटेवर कधिकधि
असाच तुझ्या आठवणींनाही बहर

आयुष्य...
दिसताना एक भकास पडलेलं रान
पण पाहता आलं तर
वाळलेलं पण जाळीदार पान

समुद्राच्या दोन्ही किना-यांना
मला एकत्र आणायचंयं
त्यासाठी समुद्राच्या मध्यावर उभं राहुन
दोन्ही किना-यांकडं एकदाच बघायचयं

समजावलं खुप त्याला मी
त्याच्या मार्गातला फ़ुल बनलो अन काटाही कधि
पण त्याचं आपलं वेगळचं
जीवन म्हणे माझं सारं काही निराळचं

समुद्राला मिळाली की
नदी स्वत:चं अस्तित्व विसरते
हे तिला ठाऊक असुनही
ती जाऊन समुद्रात मिसळते

0 प्रतिसाद: