चारोळी-६

तु समोर असलीस की
सारं जग परक होतं
एरवी आभळ पेलणारं मन
तेवढ्यापुरतं हलकं होतं

तु समोर असलीस की
पहिल्यापासुन जगावसं वाटतं
सारं जग तुझ्या नजरेनं
नव्यान बघावसं वाटतं

तु समोर असलीस की
मी मलाही परका होतो
तु फ़ुल अन मी
फ़ुलपाखरासारखा होतो

तु समोर असलीस की
वेळेचं भान उरत नाही
तुझ्यासोबतचा एक क्षण
युगं न युगं सरत नाही

तु समोर असलीस की
नुसतचं तुला पाहणं होतंअ
न तु गेल्यावर
शब्दांतुन तुला लिहीणं होतं

एक फ़ुलपाखरु
हलकेच हातावर येऊन बसलं
मला पाहुन तेही
तुझ्यासारखं खुदकन गालात हसलं

ए पावसा...
तु जा अन माझ्या प्रियेला भिजवुन ये
माझ्या वतीनं माझं प्रेम
तीच्या मनात रुजवुन ये

तु समोर असलीस की
डोळ्यांत तुझं साठणं होतं
मग तु नसताना
डोळे बंद करुन स्वप्नांत तुला भेटणं होतं

तुला बघुन
फ़ुल उमलुन येत
तेही जणु तुझचं
नाजुकपण घेत

मरण्याआधी माझी चिता
मलाच सजवायची आहे
आयुष्यातली शेवटची कामगिरीसुध्दा
मलाच बजवायची आहे

तु समोर असलीस माझ्या
की श्रावणही तरसु लागतो
विसरुन नियम त्याचे
तो ग्रिष्मातही बरसु लागतो

तु समोर असलीस की वाटतं
माझं सगळं तुला द्यावं
बदल्यात तुझ एक
फ़क्त एक हसु घ्यावं..

आठवतं तुला...
आपण दोघं पावसात भिजायचो
गारठुन गेल्यावर मात्र
एकमेकांच्या मिठित थिजायचो...

असंच एखाद्या दुपारी
आठवणींच आभाळ मनात दाटु लागतं
ग्रिष्मातलं उनही मग
श्रावणातलं वाटु लागतं

पुन्हा सांज आली
याद तुझी पुन्हा झाली
तुजवीन प्रिये...
जिंदगी माझी मलाच पोरकी झाली

तुझ्या गावची
रितच आगळी आहे
येथे कुणी न माझे
तुही वेगळी आहे

तुझी वाटेतली भेटही
आता मी मुद्दाम टाळतो
तु गेल्यावर माझं काय?
या विचारानं आजकाल मी मलाच जाळतो

पुन्हा आली ही कातरवेळ
मनात एक हूरहूर दाटवण्यासाठी
जुन्या आठवणींतली अशीच एक
आठवण आठवण्यासाठी

खुप खुप कोसळतो जरी
पाऊस आपल्या दोघांनाही हवा आहे
तुझं प्रेम मला नी माझं प्रेम तुला देतो
आपल्या प्रेमाचा हा दुवा आहे

ही हवा गुलाबी
जणु तुज स्पर्शुन आली
होतो मी कोरडा कधिचा
मज ती भिजवुन गेली

0 प्रतिसाद: