तू झरा हो..
जमेल तसा वाहत जा..
मनामनात राहत जा...
तू वारा बन..
गंध फ़ुलांचा पेरत जा...
दुसर्यांसाठी सरत जा...
तू बन घन काळा
मनमुराद बरसत जा..
स्व:तसाठी नाही..दुनियेसाठी तरसत जा..
.कधी कधी तू सुर्यही हो.
.मान्य आहे, तू जळशील..
पण दुसर्यांसाठी तू वरदान ठरशील..
नाहीच जमलं काही तर
तर तू वाळलेल्या झाडाची काठी हो...
कुणा एखाद्या आजोबाच्या हातातली लाठी हो...
--शब्द्सखा!
तू झरा हो..
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 प्रतिसाद:
सुंदर.............. शब्द अपुरे पडतात स्तुती करण्यासाठी
Post a Comment