चारोळी-४

सागराला ओढ किना-याची
तर किना-याला भिती वाहुन जाण्याची
कशी ही एकेरी नाती
या वेड्या मनांची

रुपेरी किनार असली तरी
ढग पांढरा शुभ्र नसतो
बाहेरुन सोनेरी दिसणारा ढगही
आतुन काळोखाने भरलेला असतो

जीवनाचा प्रत्येक क्षण
आपल्याला काहीतरी देत असतो
पण नकळतपणे
आपल्या आयुष्याचा
एक क्षण तो घेत असतो

जुळले काही शब्द
पुन्हा चार ओळी झाल्या
नसलीस तु जरी
आठवणी तुझ्या तुलाच घेउन आल्या

आता मीही
तुला सांगायचं टाळतो
प्रेमाची तुझी रीत
आता मीही तुझ्यासारखीच पाळतो

एकदा तुला म्हटलं होतं
आयुष्यभर तुझी साथ देइल
मला कुठं ठाउक होतं तेव्हां
आयुष्यचं माझी साथ सोडुन जाइल

जेव्हा सा-या जगाचं
माझ्याशी रुसणं होतं
तेव्हां क्षणभर परकं होऊन
स्वत:चचं स्वत:शी हसणं होतं

प्रत्येकाच्या मनात
आठवणींचा एक कपा असतो
जुन्या क्षणांना विसावण्यासाठी
मनानं बांधलेला खोपा असतो

पाऊस आला की
पावसाच्या आठवणींत बुडतो
अन पाऊस गेला की
आठवणींचाच पाऊस पडतो

पावसात चालायला मला खुप आवडतं
पावसात भिजायला मला खुप आवडतं
लोक मला वेडे म्हणतात
पण याच पावसात मला माझं बालपण सापडतं

मित्रांचं
सोबत असणंही खुप होतं
सोडुन जाताना
मनातल्या मनात रडु येतं

मैत्रि...
शब्द तसा लहान आहे
पण आत दडलेला अर्थ..
शोधता आला तर खुप महान आहे

जरा जपुन
आता चंद्राचीही तुला नजर लागेल
मला भेटायला आल्यावर
तोही तुझ्याशी परक्यासारखा वागेल

वाटतं...
तुझ्याकडं असचं पाहत राहावं
आपलं आयुष्य एकदाच तुला देऊन
कायमचं तुझं होऊन जावं

एरवी छळणा-या वा-यास विचारलं मी
का रे बाबा...आजकाल नुसताच वाहुन जातोय?
वारा म्हणाला...
वेड्या मी तुझ्या घराचं माप घेतोय

पहिला पाऊस आला
तुझी आठवण करून गेला
तुझ्यावीणा सखे...
माझ्याबरोबर तोही रडुन गेला

पहिला पाऊस म्हणजे
जणु पहीलं प्रेम असतं
कीतीही भिजलं त्यात तरी
मन भरत नसतं

तु नसलीस तरी
क्षणोक्षणी तुझा भास आहे
तुझ्या आठवणी आहेत म्हणुन
आजवर माझा श्वास आहे

कोणत्या प्रश्नांची
तुला कीती उत्तरं देऊ?
जग सारचं फ़ितुर इथं
मी नाव कुणाचं घेऊ?

पावसाचा एक थेंब म्हटला
मला तुझं थोडंसं आयुष्य हवं आहे
मी म्हटलं..अरे वेड्या
मीच अळवावरचं दव आहे

0 प्रतिसाद: