चारोळी-३

माझ्या प्रत्येक शब्दात तू...
फ़क्त तुच उरली आहे..
तुझ्या शब्दांसाठी जगतोय
जिंदगी तशी कधिच सरली आहे....

या रस्त्यावर मी चालतो
एकटाच दुरवर.....
साथीला फ़क्त भास
आठवणी मनात खोलवर

तुझी आठवण झाली की
मी मलाच हरवुन बसतो
मग मोबाईल उघडुन
तुझे जुनेच एसएमएस वाचत असतो

तुझ्या आठवणी आल्यावर
जुन्या क्षणांचा मेळ सुरु होतो
आठवणी येत राहतात
अन शब्दांचा खेळ सुरु होतो

पुन्हा मला हसायचं आहे
पुन्हा मला जगायचं आहे
कुणालातरी वाहण्यासाठी
अजुन आयुष्य मागायचं आहे

बरं झालं शब्दांची तरी साथ आहे
थोडंस दु:ख वाटुन घ्यायला
नाहीतर सारखाच लागला असता
मला जाम भरुन घ्यायला

लाट आली की
लाटेबरोबर किनारा दुर वाहुन जातो
लाट फ़िरते माघारी
किनारा मात्र तिथंच राहून जातो

स्वप्नं आभासी असली
तरी बरी वाटतात
दिवस प्रत्येक खोटाच इथं
क्षणभर स्वप्नचं खरी वाटतात

आयुष्य जगायची ती वाट आता नको
आयुष्य जगताना कोणतीच अट आता नको
सराव झाला मला काळरातींचा
प्रेमाची कोणतीच पहाट आता नको.........

तुझ्यानंतर तुला आठवणं
आता नित्याचं झालय....
तुझ्या आठवणींत रात्रींना जळतो
ते पण आता सरावानं आलयं.........

कविचं आयुष्य खुप सोपं असतं
दु:ख शब्दांच्याआड लवपता येतात
निखळलेच दोन अश्रु चुकुन तरी
शब्दांची झालर चढवुन तेही खपवता येतात

माझि मैत्रिण म्हणुन तुझं असणं
म्हणजे वाळवंटातही एखाद्या फ़ुलाचं खुलणं
तुझि मैत्रि आहे सई म्हणुनच होतं
क्षणभर आयुष्याच्या हिंदोळ्यावर ह्सत खेळत झुलणं

तुझी मैत्रि आहे म्हणुन
या मृगजळासही अस्तित्वाचा भास
एरवी मात्र.......
एका अनोळखी वाटेनेनुसता अखंड प्रवास

(Reply for above lines by one of my best friend)
तू मृगजळ म्हणतोस स्वतला
जे मिळवता येत नाही कुणाला
पण तुझी मैत्री लाभावी म्हणून
वाळवंटात राहणही चालेल मला.....................

तु निमित्त आहेस म्हणुन
या वाळवंटातही जगणं होतं
एरवी मात्र
ऐन श्रावणातही या मनाच जळणं होतं

तु निमित्त आहेस म्हणुनच फ़क्त
मी माझा आहे
तुझ्याविना मात्र
जिवन जगणं फ़क्त एक सजा आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
आयुष्य नवी उभारी घेऊ पाहतं
तू साथ असल्यावर
मरणही क्षणभर दूर उभं राहतं

तु निमित्त आहेस म्हणुन
जगण्याची आस आहे
तु नसलीस तरी या मनात
तुझी आठवण खास आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
कणाकणाचं मरणंही मला पसंत आहे
तुझ्या आठवणी आहेत म्हणुनच
या ग्रिष्मातही जणू वसंत आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
जिंकलो असा जरी हारलो मी
तू गेलीस अन
जिंकुनही असा सरलो मी

0 प्रतिसाद: