चारोळी-२

तु निमित्त आहेस म्हणुन
हा बाजार दु:खांचा आवरला मी
कडेलोट होणारा हा देह
तुझ्याचसाठी सावरला मी

तु निमित्त आहेस म्हणुन
मनात साठलेल्या आसवांचतरी डोळ्यांवाटे गळणं होतं
अरे दु:खां फ़क्त तुच माझा
पापण्यांत ओलावा आहे थोडासा हे तुझ्याचमुळे कळणं होतं

तु निमित्त आहेस म्हणुन
मी काट्यांनाही फ़ुलांचा गंध वाटतो
तुझ्यावीना मात्र
ऐन श्रावणातही माझ्यासाठी ग्रिष्म दाटतो

तु निमित्त आहेस म्हणुन
आयुष्याचा प्रत्येक क्षण सोनेरी आहे
तुझ्याशिवाय जगणं
हा विचारसुध्दा किती जिव्हारी आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
फ़क्त म्हणुनच मनाला थोडासा आधार आहे
तुझ्या मैत्रिशिवाय तसा
सगळ्यांचा असुनही मी निराधार आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
मरणाचही आता भय वाटत नाही
मरण माझं दारात उभं
अन मला तुझी सय सुटत नाही

तु निमित्त आहेस म्हणुन
मी या नियतीशी लढणार आहे
ठाउक आहे जरी मला माझ्या राखेवरुन
तु आयुष्याचा हा चढ चढणार आहे

तु निमित्त आहेस म्हणुन
मलाच विझवुन घेतले मी
समोर चिता होती जरी
हसत जाऊन मला सजवुन घेतले

तु निमित्त आहेस म्हणुन
तोच डाव पुन्हा खेळणार मी
तू गेलीस जरी एक क्षणही
तुझ्या स्वप्नांतुन ना ढळणार मी

मुळासकट उखडुनसुध्दा एक झाड
तग धरुन होतं
स्व:त संपत असतानाही
कुणासाठी ते सावली करुन होतं

जेव्हा जेव्हा आवडली
मला एखादी कळी
तेव्हा तेव्हा नशीब म्हणालं
मला हवाय तुझा बळी

जगापासुन दूर झालं म्हणुन
एक पाखरू ऊंच आकाशात तडफ़डत होतं
जग त्याच्यापासुन दूर
म्हणे ते आनंदाने फ़डफ़डत होतं

प्रेम आहे
म्हणुनच इथं जगणं होतं
रात्रिंना जागुन
दिवसा स्वप्नांना बघणं होतं

प्रेम!
नुसती कल्पनाही सुखावुन जाते
आयुष्याच्या वळणावर प्रत्येक दु:खाला
आपल्यात सामावुन घेते

प्रेम!
प्रत्येकानं एकदातरी करुन पहावं
स्व:त जगतानाही
दुसर्‍यासाठी कधि मरुन पहावं

प्रेमाची भाषा जरा अवघड असते
सगळ्यांनाच समजत नाही
ज्यांना समजते
त्यांना जगाचे बोल उमजत नाही

प्रेमात असलनां
मग सारी दु:ख सुखं वाटु लागतात
एकटं असल्यावर मात्र
सारी सुखही कटु लागतात

प्रेमात देवाणघेवाण होत नाही
तिथं फ़क्त देणं असतं
स्व:तला विसरुन
दुसर्‍यासाठी जिणं असतं

प्रेम म्हणजे शांत वादळ असतं
ज्याला सगळेचजण झेलुन घेतात
प्रेम म्हणजे मरण असतं
ज्याच्यासोबत सगळेचजण खेळुन घेतात

प्रेमाची साथ असली ना
की काट्यांतुनहि चालणं होतं
प्रेमाला पाहुन मग
त्या काट्यांचही फ़ुलासारखं खुलणं होतं.......

0 प्रतिसाद: