चारोळी-१

वाटते मनास माझ्या
मज तू इतके जवळ करावे
व्हावे काजळ मी
अन तू नयनि मला भरावे

तुझ्या नयनांचा तीर पहीला
काळजाच्या असा पार झाला
समजण्यापुर्वीच काही मी
मनावर प्रेमाचा हलका वार झाला

माझ्या दु:खांचा जेव्हा
मी बाजार मांडला होता
माझी दु:ख बघायला
सारा गाव भांडला होता

प्रेम करणं याला इथं
गुन्हा म्हणतात
मरायच्या आधिच
प्रेम करणारे हजारदा मरतात...

कोण आहेस तू....
सांगु कसे हे मी तुला
तो आरसाच फ़ितूर
दाखवी फ़क्त तुझा चेहराच तुला

फ़ना होते हुए तुझपर मर भी जाऊ अगर
मेरी मौत का तू गम ना करना
कुछ तो रिश्ता रख हमसे ए जालीम
मोहब्ब्त ना सही....पर नफ़रत हमसे तू कम ना करना

कफ़न ओढा देना लाशपर हमारे
जब ये उनकी गलीसे होकर निकलेगी
हमने तो कर दी है बंद
पर उनको देखने शायद ये आखें फ़िरसे खुलेगी

काजळी ही रात्र धुंद
तुझ्या मिठीचा ओलेला बंध
थांबावा क्षण इथचं हा...
तू अन मी ..साथीला हा श्रावण बेधुंद

काळोखच मला बरा वाटतो
तोच सार्‍या जगापासुन असतो मला वाचवत
माझाच चेहरा बर झालं
तो मला नाही दाखवत

तुझे डोळे बोलके बरचं काही बोलून जायचे
भेद तुझ्या मनीचे सारेच खोलून जायचे
शब्दांची गरज होतीच कुणाला
अबोल ओठच तुझे जणुन शब्दांची मैफ़ल व्हायचे

पायात रुते जर काटा
सल त्याची काळजास होई....
तरीही या बिचार्‍या काळजास
स्वत:हास काटा रुतवुन घेण्याची घाई.....

पून्हा पाउस आज कोसळुन गेला
मनात निजलेला आठवणींच्या समुद्रास तो फ़ेसाळुन गेला
तुझ्याशिवाय सावरलेल्या मला
एका क्षणात कसा ढासळून गेला

मी आहे थोडासा वेडा
मला थोडसं समजुन घे
रागावलो तरी...खोटचं तेही
रागास माझ्या तू उमजुन घे

माझं एकलंपण पाहुन
पावसाचा एक थेंब माझ्या तळहातावर उतरला
म्हटलं...एवढ्या दूरवरुन आला
अन माझ्या एकट्यासाठी बिथरला

पावसाचा थेंब कुठंही बरसला तरी
त्याला समुद्रालाच मिळायचं असतं
क्षणभराची ढगाची मैत्री तोडुन
समुद्राचचं नातं त्याला पाळायचं असतं

श्रावण आला निळ्याशार त्या अंबरातुनी
मेघ गेला एक सबंध रानभर बरसुनी
पुन्हा जागली नवलाई अन हिरवाई
सुरु जाहला खेळ..... क्षणात पाऊस क्षणात उन्हाची घाई...

मन भरुन आलं जुन्या आठवणींनी
आणी ते क्षण आठवले
म्हणत होतो मी मलाच रुक्ष
पण त्या क्षणांनी डोळ्यांत दोन आसवं दाटवले

आसवं माझी मी लपवून पाहीली
दु:खं माझी मी खपवून पाहीली
पावसात भिजण्यास गेलो
पापणी माझी बेफ़ाम होवुन वाहीली

खुप काही सोसावं लागतं
थोडंसं हसू मिळवण्यासाठी
हातभर दु:खांशी तडजोड
वितभर सुख उरी बाळगण्यासाठी

खुप काही सोसावं लागतं
तू दुर निघुन जाताना
कशा सांगु या मनाच्या वेदना
श्वास माझे मला सोडुन जाताना

खुप काही सोसावं लागतं
जेव्हा तुला आठवणं होतं
मग भुतकाळाच मनात दाटणं
अन आसवांचं पापण्यांआड साठवण होतं

माझ्या जगण्याला
माझ्या शब्दांचा आधार
सारं जग माझं
मी शब्दांवीना निराधार

मला दिलेली सगळी वचनं
जेव्हा तू सहज मोडली
अगदी तेव्हाच माझ्या श्वासांनी
माझि साथ सोडली

तू आणी तुझे शब्द सारखेच
कधिच वेळेवर येत नाहीत
मी मात्र वेडा
वेळ येण्याची कधि वाट बघत नाही

कधि मी आणी माझे शब्द
तुझ्यासाठी गीत गायचे
आज फ़क्त डायरी उघडुन
ते जुने शब्द वाचायचे

एक ना एक दिवस
माझ्या अश्रुंची किंमत तुला नक्की कळेल
पण कधी?
हं...कदाचीत मी जेव्हा सरणावर जळेल

मी आहेच जरा असा
शब्दांनी बेभान होणारा
श्वासांना माझ्याच परके
अन शब्दांना आपले म्हणनारा

पुन्हा माझे शब्द
आणी तुझ्या आठवणींची भेट झाली
पुन्हा डोळ्यांत या
आसवांची हलकी लाट आली

जगण्याची मुहुर्तमेढ
पुन्हा रोवुन बैसलो मी
अता घाबरु कुणाला
त्या मरणाकडे स्व:त धावुन बैसलो मी

प्रेम इथं नाकारलं जातं
तरीही कृष्णास इथं भजलं जातं
प्रेम असतं कुणाचं
पण भाळी दुसरचं कुणीतरी सजलं जात

पुन्हा एकदा
शब्दांची मैफ़ल सजवली मी
पुन्हा एकदा तुझी प्रित
माझ्या शब्दांत भिजवली मी

मी कुठे अजुन पत्ते उघडले
त्यांनीच डाव मोडला
मी जिंकणार इतक्यात
त्यांनी डाव सोडला

आता मलाही जमायला लागलं आहे
तुझ्याशिवाय जगणं
रात्रींचे दिवस करुन
स्वप्नांत तुला बघणं

ती वाट आणी ते वळण
कधिच नजरेआड झालयं
तुझ्यावीना जगलो आजवर
आता शेवटचं वळण आलयं

मी अखेरच्या वळणावर
आणी तुझ्या माझ्या हातात हात
तुला आपलं म्हणु तरि कसा
मरण माझं नेहमिच माझ्या साथ

जरा सांभाळुन ये
मला भेटायला येताना
जग टपलेलंच असतं
तू घरातुन बाहे्र निघताना

मी मरताना माझां गाव
माझ्यासमोर असेल सारा
मी एकटाच निपचीत पडलेला
एरवीचं वादळ...आज निर्मोही वारा

त्या वादळास मी सांगतो की
'तुलाच मी लुटणार आहे'
आज दिवस तुझा
उद्या मी सुटणार आहे!

जगायचं किती आणी कुठवर
रोज रोज तोच दिवस
रात्र सरते..पहाट होते....
पुन्हा एकदा जगण्याचे नवस

जरा सांज ढळू दे
सये चंद्रास थोडं जळू दे
मग दीप मालव
आणी ओठांना ओठांनी छळू दे

थोड्या विसाव्यानंतर
मी पुन्हा येणार आहे
मी एक झंझावात
मी कधि थांबणार आहे?

माझ्या अंगणाचा पारिजात
तुझ्यासाठीच खुलतो आहे
कधितरी तू येशील म्हणुन
वादळं आणी पाऊस झेलतो आहे

माझ्या वेदनांचा
मी कधिच बाजार मांडला नाही
तसं...माझ्या वेदना पहायला
कुणीच कधि भांडला नाही

आठवणी आठवुन जगावं
दु:खांचा बाजार जरा ओसरतो
नाहीच मिळालं काही तरी
आठवणींचा सुगंध आयुष्यभर पसरतो

तुझी आठवण आल्यावर
माझं माझ्याशिच खुदकन हसणं होतं
वेळ तेवढ्यापुरती निघुन जाते
अन पुन्हा माझ्याशी माझं रुसणं होतं

माझ्या आयुष्याचे कितीतरी क्षण
तू सोबत घेउन गेलिस
अन बदल्यात मला
तुझ्या छळवादी आठवणी देवून गेलीस

मी असे काय लीहीले
ज्यास ते जाळून गेले
त्यांची सारी पारायणं माझ्यासमोर
आज पुन्हा ते उगाळून गेले

तुझ्या विरहात तुझ्या आठवांचे
असे निखारे पेटले
तुला सुखाच्या झोपाळ्यावर झुलताना पाहुन
निखारेही मज चांदण्यासम वाटले

निखार्‍यांवरुन चालण्यास माझि
कधिच ना नव्हती
पण तुझी मात्र एकदाही
फ़ुलांवरुन चालण्यास हा नव्हती

अश्रुंना माझ्याच रागावलो मी
कधिही तुझ्या विरहात बरसत असतात
मी श्रावणात भिजताना
तेही बरसण्यासाठि तरसत असतात

सये तू जवळ नसताना
श्वास माझेच माझ्याशी परके होऊन वागतात
कदाचित माझ्यासवे तेही
तुझ्या आठवणींत मला विसरतात

सये तू नसताना
तुझ्या आठवणींत वेडापिसा होतो
मी घेतलेला प्रत्येक श्वास
सये, तुझ्याविणा नकोसा होतो

सये तू जवळ नसताना
तुझ्या असण्याचे भास
सये तू जवळ नसताना
माझे रीते रीते श्वास

सये तू जवळ नसताना
तुझ्या येण्याची चाहूल
तू येत नाहीस कधि
मनावर उमटतं तुझ्या आठवणीच पाऊल



सये तू जवळ नसताना
सारं जग वीरान वाटू लागतं
इवल्याशा मनात माझ्या
तुझ्या आठवणींचं प्रचंड आभाळ दाटू लागत

सये तू जवळ नसताना
मी कुठेचं नसतो
तू असताना मात्र
सारं जग विसरून तुझ्या डोळ्यातुन हसतो

सये तू जवळ नसताना
पाऊसही मला टाळून जातो
तो बरसतो रानभर
मला मात्र जाळून जातो

सये तू जवळ नसताना
मी जगावं कसं सांग ?
तुझ्यावीना माझ्या डोळ्यांनी
काही बघावं कसं सांग?


मी तुझ्याकडे पाहिल्यावर
ढळणारी सांज थांबली
तुझ्या ओठांची लाली मिळावी जरासी म्हणुन
तीही मुद्दामहुन लांबली

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
पुन्हा जगावसं वाटलं
तुझ्याशिवाय जगलेलं आयुष्य
पुन्हा मागावसं वाटलं

सये तू जवळ नसताना
चंद्रही नेहमीसारखा खुलत नाही
तुझा गंध घेतल्याशिवाय आता
सये रातराणीही खुलत नाही

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तुझ्या नजरेत नजर मिसळली
एरवी मंद होती
आता मात्र स्पंदनांची लाट उसळली

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
प्रेम काय असतं हे समजलं
क्षणभर वाटलं,
जगात सर्वात सुंदर प्रेम - जगाला अजुन नाही उमजलं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
नवी स्वप्न सजु लागतात
आयुष्यातली सारी दु:ख
सुखं होण्यासाठी धजु लागतात

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
वाटले, जणु हा जन्म कमी पडेल
तुझ्याशी प्रेमाचं हे नातं
आता जन्मोजन्मी जडेल

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
चंद्र बिचारा माझ्यावर जळत असतो
हुशार आहे पण तोही
ढगाआड जातो तो, मी जेव्हा तुझ्या मीठीत ढळत असतो

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
वाटतं, आता सारं थांबाव
फ़क्त याच एका क्षणानं
आता आयुष्यभर लांबावं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
तू तरी कुठे स्वत:ची उरतेस
मी तुला पहावं पुन्हा पुन्हा म्हणुन
रोज माझ्यासाठी सजतेस

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
सारं जग फ़ितुर होतं
का ग राणी हे असं
सौंदर्याच्या नाशासाठी जग सारं आतुर होतं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
वाटतं, सारं आयुष्य तुला द्यावं
बदल्यात फ़क्त एकदा
मला तू तुझ्या मिठीत घ्यावं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
मन क्षणभर बावरलं
नंतर पटलं
बावरल्या मनाला तुच तर सावरलं

मी तुझ्याकडे पाहिल्यावर
माझाही मी उरत नाही
तुझ्याकडं पाहताना
या जगात मी मलाही धरत नाही

1 प्रतिसाद:

Ajay Sonawane said...

खुप मस्त चारोळ्या लिहितोस तू बरं का ! असंच लिहीत जा.

-अजय